घररायगडयंदाही पोलादपूरकरांना पुराचे भय, सावित्रीच्या पात्रातील गाळ काढण्याची मागणी

यंदाही पोलादपूरकरांना पुराचे भय, सावित्रीच्या पात्रातील गाळ काढण्याची मागणी

Subscribe

शासनाकडून चिपळूणमधील वशिष्ठी आणि महाड तालुक्यात सावित्री व गांधारी नदीच्या पात्रात ाटबंधारे विभागामार्फत गाळकाढण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच शासनाने पोलादपूर शहरालगत वाहणार्‍या सावित्रीच्या पात्रातील गाळ काढून दिलासा द्यावा अशी नागरिक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

डोंगराळ पोलादपूर तालूक्यात गेल्या काही वर्षापासून प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. त्यात मुंबई गोवा महामार्गाच्या कामात लाखो वृक्षांच्या कत्तलीची भर पडली आहे. तसेच महामार्गामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या शहरांच्या हाकेच्या अंतरावर आलेल्या या तालुक्यात धनदांडग्यांनी शेतकर्‍यांकडून हजारो एकर जमिनी खरेदी केल्या आहेत. या जमिनींवर बंगले, इमारती, फार्म हाऊसेस बांधले आहेत. त्यासाठी वरकस जमिनीचे उत्खनन, लहानमोठया टेकडयांचे सपाटीकरण करण्यात आले आहे.

या सर्व प्रकारामुळे डोंगरमाथ्यावरून पावसाळ्यात वाहून येणारा पालापाचोळा आणि दगड- धोंड्यासह धूप झालेल्या मातीमुळे सावित्री नदीच्या पात्रातील डोह गाळाने भरून गेले आहेत. येथील नदीचे पात्र वाळू माती मिश्रीत रजग्याने वाळवंटबनले असून उथळ झाले आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात १०० मिली मीटर पाऊस पडला तरी पूरसदृश्य स्थिती निर्माण होते किंवा पावसाचा जोर वाढल्यास नदीच्या पाण्या च्या पातळीत वाढ होऊन पूर येत असतो. परिणामी शहराच्या नदीकाठच्या उपनगरातील लोकवस्तीला आणि पूर्वेकडील चरई गावाच्या नदीकाठाकडील घरांना धोका पोहचत आहे. मात्र,या समस्येबाबत आजतागायत शासनाने कुंभकर्णी भूमिका घेतल्याचेच दिसून येत असल्याने आता हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

२५ व २६ जूलै २००५ रोजी तीन दिवस सलग पडलेल्या अतिवृष्ठीमुळे सावित्री नदीला महापूर आला होता. पोलादपूर शहरात महापूराचे पाणी घुसले होते. यामध्ये घराघरातील व दुकानातील वस्तू आणि सामानासह कपडे,भांडीकुंडी दागीने सर्वकाही वाहून नेले होते. पावसाळ्यात पुराचे भय उराशी बाळगत काठालगतच्या रहिवाशांनी उद्धवस्त झालेले संसार पुन्हा नव्या उमेदीने उभे केले. मात्र, आजमितीस शासनाच्या दुर्लक्षामुळे भय इथले संपलेले नाही हे वास्तव आहे.

महाबळेश्वर येथे उगम पावलेली सावित्री नदी खाली पोलादपुर तालुक्यात उतरत असून पोलादपूर शहरापर्यंत वाहत येताना तिला खोर्‍यातील डोंगररांगांतून वाहणार्‍या ढवळी, कामथी घोडवनी या तीन उपनद्या रानबाजीरे धरणा अलीकडे वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात. त्यामुळे सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होते. हेच पाणी रानबाजीरे धरणातून पोलादपूर शहरात मोठया प्रमाणावर सोडण्यात येत असतानाच कोतवाल ओंबळी परिसरातून येणारे चोळई नदीचे आणि मोरगिरी गावाच्या भागातून आलेले उपनदीचे पाणी सावित्री नदीला मिळते. त्यामुळे शहराच्या सीमेवर एकमेकात मिसळल्यामुळे पोलादपूर आणि चरई गावाच्या परिसरात प्रचंड प्रमाणावर पाण्याच्या पातळीत वाढ होत असून पाण्याच्या महाकाय लोंढयाला निचरा होण्यासाठी चरई पूलाचे खांब अडथळा ठरतात. तसेच उथळ पात्रामुळे मोठया प्रमाणावर पाण्याच्या पातळीत वाढ होते आणि आजूबाजूच्या नागरी वस्तीत शिरते.

- Advertisement -

२०० ५ साली आलेल्या महापुरापासून सावित्री नदीच्या पात्रातील डोह दगडधोंडे, माती, पालापाचोळा, कचरा यांनी भरून गेले आहेत. परिणामी पोलादपूरवासीयांना गतवर्षी पुन्हा पुराचा सामना करावा लागला आहे. शासनाकडून चिपळूणमधील वशिष्ठी आणि महाड तालुक्यात सावित्री व गांधारी नदीच्या पात्रात ाटबंधारे विभागामार्फत गाळकाढण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच शासनाने पोलादपूर शहरालगत वाहणार्‍या सावित्रीच्या पात्रातील गाळ काढून दिलासा द्यावा अशी नागरिक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

तालुक्यात दरवर्षी अंदाजे साडेचार हजार मिली मीटर पाऊस पडतो. त्यामुळे दरवर्षी शहराच्या काठालगतच्या दोन्ही तीरावर पुरस्थिती उद्भवते. गेल्या वर्षी सावित्री नदीच्या पुराचे पाणी सिध्देश्वर आळी शिवाजीनगर भागात पूर्वेच्या काठावरील चरई गावाच्या काठालगतच्या घरांमध्ये शिरले होते. मात्र यावेळी पोलादपूर-चरई पूलाला जोडणारा चरई गावाकडील भरावाचा रस्ता पाण्याच्या लोंढयाने उद्धवस्त करून वाट काढल्यामुळे पाण्याचा निचरा झाला आणि मोठा अनर्थ टळला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -