घरमनोरंजनRamesh Deo Death | ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

Ramesh Deo Death | ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

Subscribe

रमेश देव यांनी आतापर्यंत 285 हिंदी चित्रपट, तर 190 मराठी चित्रपटात भूमिका केलीय. तसेच 30 हून अधिक मराठी नाटकात कामे केलीत. त्याचप्रमाणे रमेश देव यांनी अनेक मराठी चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शनवरील अनेक मालिकांत काम केले असून, अनेक मालिका दिग्दर्शितही केल्यात. सिनेक्षेत्रातील त्यांच्या अजरामर कारकिर्दीसाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेय.

मुंबईः ज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश देव (ramesh deo) यांचे निधन झालेय. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अजिंक्य देव (ajinkya deo) यांनी दिली. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांची धीरुभाई अंबानी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. मराठी सिनेसृष्टीत नायक आणि खलनायक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. रमेश देव यांच्या पश्चात पत्नी सीमा देवा, मुलगा अजिंक्य देव आणि मुलगा अभिनय देव असा परिवार आहे. अभिनय देव हा दिग्दर्शक असून 2011मध्ये त्याने दिल्ली बेली या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर अजिंक्य देव अभिनेता आहे.

- Advertisement -

3 फेब्रुवारीला सकाळी 10 : 30 वाजता अंधेरीतील घरी रमेश देव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दुपारी विलेपार्ले पूर्व येथील पारसी वाडा येथे रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती अंजिक्य देव यांनी दिली आहे.

वयोमानामुळे रमेश देव यांची प्रकृती खालावत होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश देव लवकरच एका मालिकेतही दिसणार होते. रमेश देव यांनी ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात सिनेसृष्टीत पदार्पण केले. बॉलिवूडमधील खलनायकाच्या अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या. आनंद सिनेमातील त्यांची भूमिका आजही अजरामर राहिलीय. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिकेत त्यांनी भारदस्त कामगिरी करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली होती. प्रेक्षकांनीही त्यांना नायक आणि खलनायक अशा दोन्ही व्यक्तिरेखेत स्वीकारले. दरम्यान अवघ्या 3 दिवसांपूर्वी म्हणजेच 30 जानेवारी 2022 ला रमेश देव यांचा 93वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने देव यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

- Advertisement -

रमेश देव यांनी आतापर्यंत 285 हिंदी चित्रपट, तर 190 मराठी चित्रपटात भूमिका केलीय. तसेच 30 हून अधिक मराठी नाटकात कामे केलीत. त्याचप्रमाणे रमेश देव यांनी अनेक मराठी चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शनवरील अनेक मालिकांत काम केले असून, अनेक मालिका दिग्दर्शितही केल्यात. सिनेक्षेत्रातील त्यांच्या अजरामर कारकिर्दीसाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेय. रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी महाराष्ट्रातील अमरावतीत झाला. त्यांचे वडील कोल्हापूरचे न्यायाधीश होते. त्यांचे आजोबा इंजिनीअर असल्याने ते कोल्हापुरात स्थलांतरित झाले होते. रमेश देव यांनी 1951 मध्ये पाटलाची पोर या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 2013 मध्ये रमेश देव यांना 11 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आंधळा मागतो एक डोळा, देवघर, साता जन्माची सोबती, पैशांचा पाऊस, सुवासिनी, माझी आई, भाग्यलक्ष्मी, माझा होशील का?, पत्नी, परदेस, दर्पण, दस लाख, मुजरिम, खिलोना, जीवन मृत्यू यांसारख्या अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले. आरती हा त्यांच्या पहिला बॉलिवूड सिनेमा होता. 2013 मध्ये रमेश देव यांना 11व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कारने गौरवण्यात आलेय.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीसुद्धा रमेश देव यांनी श्रद्धांजली अर्पण केलीय. ज्येष्ठ चरित्र अभिनेते रमेश देव यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलंय.

याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही भावना व्यक्त केल्यात. ही सर्वात मोठी दुख:द बातमी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीतला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नट आपल्यातून गेलाय. अतिशय उत्तम नट आणि चांगले माणूस होते. माझे आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. तसेच ते मला माझ्या मोठ्या भावासारखे होते. ते नेहमी मला धाकट्या भावासारखे मानायचे. चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर मी त्यांच्यामुळे उभा राहिलो. त्यामुळे ही माझ्यासाठी मोठी आठवण आहे. तसेच त्यांच्यासोबत मी बरेच चित्रपट केले. 30 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस असताना माझं त्यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं, अशी आठवणही अशोक सराफ यांनी सांगितलंय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -