घररायगडसुधागडमध्ये विटांनी खाल्ला भाव, तब्बल ८ रुपयांना एक वीट

सुधागडमध्ये विटांनी खाल्ला भाव, तब्बल ८ रुपयांना एक वीट

Subscribe

जिल्ह्यात कित्येक कोटींची उलाढाल या उद्योगात होते. सध्या सर्वत्रच मोठ्या प्रमाणात विटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. मात्र,अवकाळी पावसामुळे असंख्य कच्च्या विटा खराब झाल्या आहेत.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. मात्र ,आता ऐन हंगामात विटांना मागणी वाढली आहे. त्यात विटांची कमतरता असल्याने विटांचे भाव वधारले आहेत. मागील वर्षी तसेच गेल्या महिन्यात चार ते साडेचार रुपयांना मिळणारी एक वीट आता तब्बल आठ रुपयांना मिळत आहे. या भावाढीमुळे वीट वीटभट्टी चालक व मालक सुखावले आहेत. अवकाळी पावसानंतरही ज्यांचा माल चांगला राहिला आहे त्या वीटभट्टी मालक व चालकांना आता सुगीचे दिवस आलेले आहेत.

जिल्ह्यात कित्येक कोटींची उलाढाल या उद्योगात होते. सध्या सर्वत्रच मोठ्या प्रमाणात विटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. मात्र,अवकाळी पावसामुळे असंख्य कच्च्या विटा खराब झाल्या आहेत. विटा पाडण्यासाठी जमा करून ठेवलेली माती देखील पावसामुळे वाहून गेली किंवा भिजली आहे. विटा भाजण्यासाठी लागणार भाताचा कोंडा, कोळसा किंवा तूस देखील पावसामुळे भिजल्याने वीट भट्टी लावणे म्हणजेच पक्क्या विटा पडणे देखील मुस्किल झाले होते. मात्र आता विटांना चांगला भाव मिळत असल्याने वीटभट्टी मालकांनी व चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

अवकाळी पावसामुळे अनेकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र तयार पक्क्या विटांना मागणी असून चांगला भाव देखील मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी ७ रुपये प्रतिवीट किंमतीने ३० हजार विटा विकल्या आहेत. सध्या ८ रुपये प्रती वीट भाव सुरू आहे.
– दिपक कोकरे, वीटभट्टी मालक शेतकरी, सुधागड

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -