घररायगडफॉरेन्सिक अहवाल दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न, रायगडावरील समाधीसमोर राखसदृश पावडरप्रकरणी संभाजी ब्रिगेडचा आरोप

फॉरेन्सिक अहवाल दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न, रायगडावरील समाधीसमोर राखसदृश पावडरप्रकरणी संभाजी ब्रिगेडचा आरोप

Subscribe

महाडमधील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत किल्ले रायगडावर झालेल्या शिवसमाधीच्या विटंबना प्रकरणी पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. मात्र याबाबत कारवाई करताना दिरंगाई करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर राखसदृश पावडर आणून पुस्तक पूजन केल्याचा धक्कादायक प्रकार डिसेंबर २०२१ मध्ये समोर आला होता. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र याबाबत अद्याप फॉरेन्सिक अहवाल सादर केलेला नाही. तसेच आरोपींवर कारवाई करण्याबाबत महाड तालुका पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वैशाली बेलदरे आणि रुपाली दाभाडे यांनी महाडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

किल्ले रायगडावर ८ डिसेंबर २०२१ रोजी हा प्रकार घडला होता. पुणे येथील प्रदीप बेलदरे पाटील, वैशाली बेलदरे पाटील, पूजा झोळे आणि इतर शिवप्रेमी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यास आले होते. यावेळी शिवसमाधीजवळ काही व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. यावेळी गडावर पुस्तक पूजन व राखसदृश्य पावडर, चंदन पावडर मिश्रण करून आक्षेपार्ह कृत्य करणार्‍या पाच व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे विसर्जन करण्याचा घाट रचल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने महाडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या वैशाली बेलदरे आणि रुपाली दाभाडे, पूजा झोळे यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला. पोलीस आरोपींना वाचवण्यासाठी दिरंगाई करत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

- Advertisement -

महाडमधील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत किल्ले रायगडावर झालेल्या शिवसमाधीच्या विटंबना प्रकरणी पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. मात्र याबाबत कारवाई करताना दिरंगाई करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. डब्यातील राख फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आली. मात्र अहवाल प्राप्त झाला की नाही याबाबतची माहिती ज्यांच्याकडे तपास आहे ते पोलीस अधिकारी निलेश तांबे काहीच उत्तर देत नाहीत. सदर तपास यापूर्वी पोलीस अधिकारी औसरमल, त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांच्याकडे होता. आता स्वतः पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश तांबे यांनी हा तपास स्वत:कडे मागवून घेतला. तरी देखील कोणत्याच प्रकारची कारवाई दिसून आलेली नाही.पोलिसांच्या दिरंगाईमुळे फॉरेन्स्कि अहवाल देखील बदलला जाऊ शकतो असा दाट संशय वैशाली बेलदरे आणि रुपाली दाभाडे, पूजा झोळे यांनी यावेळी व्यक्त केला. याबाबत पुढील आठ दिवसात कारवाई न झाल्यास संपूर्ण शिवप्रेमी आंदोलनात्मक भूमिका घेतील असा इशारा देखील देण्यात आला.

रायगडावरील मदार मोर्चा याठिकाणी अशाच प्रकारे घटना घडली असता खासदार संभाजीराजे यांनी पत्रव्यवहार करून आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र या घटनेवेळी केवळ फॉरेन्स्कि अहवाल येवू द्या एढेच उत्तर दिले आहे. आमदार अण्णा बनसोडे, आमदार अमोल मिटकरी, आमदार निलेश लंके, आमदार सुनील शेळके यांच्यासह पाच आमदार याबाबत आक्रमक असले तरी त्यांच्यावर देखील हिंदुत्ववादी संघटना दबाव आणत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -