घररायगडखोपोलीनजिक सहलीच्या बस दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; ४८ जण जखमी

खोपोलीनजिक सहलीच्या बस दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; ४८ जण जखमी

Subscribe

या बसमध्ये एकूण ४८ विद्यार्थी आणि दोन शिक्षक होते. चेंबूर येथील मयांक या खाजगी क्लासचे विद्यार्थी लक्झरी बस बस(एमएच०४/जीपी २२०४) मधून लोणावळ्यातील ‘वेट न्ड जॉय’ येथे आले होते. परतीचा प्रवास करताना बस खंडाळा घाटातील अंडा पॉईट जवळील वळणावर असली असता हा अपघात झाला आहे.

हाळ खुर्द: मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावरील बोरघाट परिसर मृत्यूचा सापळा बनला असल्याचे बनत चालला असल्याचे चित्र असून सरासरी दरोज अपघात आणि त्यात जिवीत हानी होत असल्याचे निदर्शनास येते. याच बोरघाटात खोपोलीतील अंडा पॉईंटनजिक चेंबूर येथील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांच्या लक्झरी बसला भीषण अपघात होत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अन्य विद्यार्थ्यांपैकी अनेकांना मोठ्या प्रमाणात मार लागला आहे तर काही जण किरकोळ प्रमाणात जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एक सदरची दुर्घटना घडली. या बसमध्ये एकूण ४८ विद्यार्थी आणि दोन शिक्षक होते. चेंबूर येथील मयांक या खाजगी क्लासचे विद्यार्थी लक्झरी बस बस(एमएच०४/जीपी २२०४) मधून लोणावळ्यातील ‘वेट न्ड जॉय’ येथे आले होते. परतीचा प्रवास करताना बस खंडाळा घाटातील अंडा पॉईट जवळील वळणावर असली असता हा अपघात झाला आहे.

अपघाताची माहिती समजताच बोरघाट तसेच खंडाळा महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामजिक संस्थेचे कार्यकर्ते आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल होत बसमधील जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली, अपघातामधील जखमींना खोपोली भागातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच गंभीर जखमींना पनवेल एमजीएम रूग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. या अपघातात एक मुलगाआणि एका मुलीचा दुदैवी मृत्यू झाला आहे. हे दोघेही क्लासचे विद्यार्थी आहेत. दरम्यान, बस हायड्राच्या साह्याने बाजूला घेण्यात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

जखमींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. खालापूर तहसीलदार अय्युब तांबोळी यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाकडून सर्व जखमी रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संकटापासून सर्व विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका व्हावी यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. त्यांना देवदूत टीम, आयआरबी पेट्रोलिंग, खोपोली पोलीस, बोरघाट वाहतूक पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य, लोकमान्य आरोग्य सेवा, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवान यांची साथ मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, खोपोली शहर आणि परिसरात या जखमींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आली होती, यावेळी अनेक चर्चांना ऊत आला होता.
===========

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -