घरक्रीडासायना पहिल्याच फेरीत गारद!

सायना पहिल्याच फेरीत गारद!

Subscribe

ऑलिम्पिक पात्रतेची आशा धूसर,ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. जपानच्या अकाने यामागूचीने तिच्यावर सरळ गेममध्ये मात केली. त्यामुळे तिला आता टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यास बरीच मेहनत करावी लागणार आहे. सायना सध्या जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानी आहे आणि ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तिला २८ एप्रिलपर्यंत अव्वल १६ खेळाडूंमध्ये प्रवेश मिळवावा लागेल.

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सायनावर जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या अकाने यामागूचीने ११-२१, ८-२१ अशी मात केली. यामागूचीविरुद्ध ११ सामन्यांतील हा सायनाचा नववा पराभव होता. तसेच यंदाच्या मोसमात कोणत्याही स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत होण्याची सायनाचा तिसरी वेळ होती. आता तिला टोकियो ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी आगामी स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. सायना यापुढे स्विस ओपन, इंडिया ओपन आणि मलेशिया ओपन या स्पर्धांमध्ये खेळणार आहे.

- Advertisement -

लक्ष्य सेन दुसर्‍या फेरीत
भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. त्याने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या चेऊक यीऊ लीचा १७-२१, २१-८, २१-१७ असा पराभव केला. आता दुसर्‍या फेरीत लक्ष्यसमोर दुसर्‍या सीडेड डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनचे आव्हान असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -