घरक्रीडाAUS vs ENG : ॲशेसच्या पहिल्याच दिवशी इंग्लंड १४७ धावांवर ऑलआउट; क्वीन्सलँड...

AUS vs ENG : ॲशेसच्या पहिल्याच दिवशी इंग्लंड १४७ धावांवर ऑलआउट; क्वीन्सलँड पोलिस करणार प्रकरणाची चौकशी

Subscribe

ॲशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात १४७ धावांवर सर्वबाद झाला

ॲशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात १४७ धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक ५ बळी पटकावले आणि कित्येक विक्रमांना गवसणी घातली आहे. कमिन्स सोबतच स्टार्क आणि हेझलवुडने देखील २-२ बळी घेऊन पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांना चितपट केले. तर कॅमरून ग्रीनला एक बळी घेण्यात यश आले. इंग्लंडचा संघ छोट्या धावसंख्येवर सर्वबाद झाल्याने संघाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अशातच क्वीन्सलँड पोलिसांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून इंग्लंडच्या संघाची फजिती उडवली आहे.

क्वीन्सलँड पोलिसांनी देखील ट्विट करून इंग्लंडच्या संघाबाबत हास्यास्पद टिप्पणी केली आहे. पहिल्यांदा पोलिसांनी ट्रॅफीकबाबत माहिती देताना ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंचा उल्लेख केला. या ट्विटमध्ये पोलिसांनी लिहले की, “गाबा कसोटी सामन्यासाठी खूप गर्दी आहे. त्यामुळे बाहेर निघण्यापूर्वी ट्रॅफीकची स्थिती पहा. जर आम्ही गाब्यात सर्वत्र हिरवे दिवे असतील असे म्हटले तर ते खोटे ठरेल. नंतर असे बोलू नका आम्ही याबाबत कल्पना दिली नव्हती”. दरम्यान या ट्विटमध्ये पोलिसांनी पॅट कमिन्स, नाथन लिऑन, कॅमरून ग्रीड आणि डेविड वॉर्नर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

- Advertisement -

तर दुसऱ्या ट्विटमध्ये क्वीन्सलँड पोलिसांनी लिहले की, गाबा कसोटी सामन्यातील फलंदाजांची नक्कल करणाऱ्या एका समूहाचा तपास सुरू आहे.

- Advertisement -

दरम्यान या सामन्यामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी खूपच निराशाजनक खेळी केली आणि संपूर्ण संघ अवघ्या १४७ धावांवर तंबूत परतला. रॉरी बर्न्स सामन्याच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि नंतर कर्णधार जो रूट देखील खाते न उघडताच माघारी परतला. इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ ओली पोप (३५) आणि हसीब हमीद (२५) अशी साजेशी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच फलंदाजाला यश आले नाही.


हे ही वाचा: http://Asian Champions trophy : भारतीय महिला हॉकी खेळाडू कोरोना संक्रमित; कोरियाविरूध्दचा महत्त्वाचा सामना रद्द


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -