Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Asia cup 2023 : नेपाळविरुद्धच्या सामन्याआधी जसप्रीत बुमराह मुंबईत; काय आहे कारण?

Asia cup 2023 : नेपाळविरुद्धच्या सामन्याआधी जसप्रीत बुमराह मुंबईत; काय आहे कारण?

Subscribe

Asia cup 2023 : भारतीय संघाची (Indian Team) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत चांगली सुरुवात झाली नाही. पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिलाच सामना पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे भारतीय संघाला सुपर-4मध्ये पोहचण्यासाठी कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे उद्या (4 सप्टेंबर) नेपाळविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थिती जिंकायचा आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेहून मुंबईत परतला आहे. (Asia cup 2023 Jasprit Bumrah in Mumbai ahead of match against Nepal What is the reason)

जयप्रीत बुमराह कौटुंबिक कारणांमुळे भारतात परतला आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नहाी, असे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसामुळे त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तसेच तो सध्या मुंबईत परतला असल्यामुळे नेपाळविरुद्धच्या सामन्यातही तो खेळताना दिसणार नाही. परंतु तो सुपर-4 सामन्यांसाठी श्रीलंकेत परतेल, असेही सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Asia Cup 2023 : भारतीय संघाच्या पुढील सामन्यावरही पावसाचे सावट; सुपर-4 मध्ये कसा पोहोचणार?

जयप्रीत बुमराहने 13 महिन्यांनंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. पण त्याला पावसामुळे एक षटकही टाकता आले नाही. त्याने 14 जुलै 2022 रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. परंतु आता जयप्रीत बुमराह उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला नेपाळविरुद्ध खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ सुपर-4मध्ये पोहचणार?

- Advertisement -

भारत विरुद्ध नेपाळ सामन्यावर पावसाचे सावट आहे. या सामन्यादरम्यान 88 टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघाने नेपाळविरुद्ध सामना जिंकला तर त्यांना 2 गुण मिळणार आहेत किंवा पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघाला 1 गुण मिळेल. म्हणजे दोन्ही परिस्थितीत भारतीय संघ सुपर-4मध्ये पोहचणार आहे. परंतु नेपाळ संघाने भारताचा पराभव केल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला नेपाळ संघासमोर आपले स्पर्धेतील आव्हान कायम राखावे लागणार आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023 : खेळाडूचा फॉर्म महत्त्वाचं की नाव? लाईव्ह चर्चेदरम्यान मोहम्मद कैफ आणि गौतम गंभीर भिडले

पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना अनिर्णित

दरम्यान, भारत-पाकिस्तान सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला, मात्र भारताची खराब सुरूवात झाली. अवघ्या 66 धावांवर भारताने आपल्या 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागिदारी केली. यावेळी इशान किशनने 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली तर, हार्दिक पांड्याने 87 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 90 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने सर्वबाद 266 धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी सर्व दहा विकेट घेतल्या. शाहीनने 35 धावांत 4 विकेट तर, हरिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

- Advertisment -