घरक्रीडाAsian Games : भारतीय पुरुष संघ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत; नेपाळकडून...

Asian Games : भारतीय पुरुष संघ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत; नेपाळकडून चुरशीची लढत

Subscribe

Asian Games : चीनच्या हांगझोऊ शहरात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा 2022 (Asian Games 2022) स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. महिला क्रिकेट संघानंतर आता पुरुष संघानेही (India) नेपाळचा (Nepal) पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. (Asian Games Indian mens team in semi finals of Asian Games Tough fight from Nepal)

हेही वाचा – अंधभक्तांच्या कुजबुजीवर वारसा टिकत नाही, त्यासाठी…; ठाकरे गटाचा मोदी-शहांवर निशाणा

- Advertisement -

भारतीय संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जायस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 103 धावांची भागिदारी रचली. ऋतुराज गायकावड 23 चेंडूंत 25 धावा करत बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि जितेश शर्मा झटपट बाद झाले. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र यशस्वी जायस्वालने चांगला खेळ करत 49 चेंडूंत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 100 धावांची खेळी केली. यानंतर रिंकू सिंग 37 आणि शिवम दुबे यांने 25 धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारतीय संघाने निर्धारीत 20 षटकात 4 विकेट गमावत 202 धावांचा डोंगर उभा केला. दीपेंद्र सिंगने 2 विकेट तर सोमपाल कामी आणि लामिछानेला  प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

- Advertisement -

हेही वाचा – अबब… बिहारच्या लोकसंख्येत 25 टक्क्यानी वाढ; जातीनिहाय जनगणनेतून प्रकार उघड

नेपाळकडून चुरशीची लढत

भारताकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना नेपाळसारख्या दुबळ्या संघाने नऊ विकेट गमावत 179 धावांपर्यंत मजल मारली. दीपेंद्र सिंगने सर्वाधिक 32 धावा केल्या. याशिवाय संदीप जोरा आणि कुशल मल्लाने 29 धावांचे, कुशल भुरटेलने 28 आणि करणने 18 धावांचे योगदान दिले. त्यामुळे नेपाळ संघाला अवघ्या 23 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आवेश खान आणि रवी बिश्नोईला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या तर, अर्शदीपसिंगला 2 आणि रविसारनिवासन साई किशोरला 1 विकेट मिळाली. या विजयासह भारतीय पुरुष संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -