घरमहाराष्ट्रत्यांना मंत्रिपदाचा योग्य वापर करता येत नाही; भुजबळांच्या टीकेवर रोहित पवारांचं प्रत्युत्तर...

त्यांना मंत्रिपदाचा योग्य वापर करता येत नाही; भुजबळांच्या टीकेवर रोहित पवारांचं प्रत्युत्तर म्हणाले, मी स्वत: …

Subscribe

जर मंत्र्यांचं चालत नसेल तर सामान्य लोकांचं या सरकारमध्ये काय चालणार असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

अहमदनगर: छगन भुजबळ हे मंत्री असताना त्यांना सभा घ्यावा लागत आहेत, याचाच अर्थ या सरकारमध्ये मंत्र्यांचं ऐकलं जात नाही हे स्पष्ट होतं. जर मंत्र्यांचं चालत नसेल तर सामान्य लोकांचं या सरकारमध्ये काय चालणार असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. (They are unable to use the ministry properly Rohit Pawar s reply to Chhagan Bhujbal s criticism said )

छगन भुजबळ यांनी राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. भुजबळ म्हणाले होते की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनावेळी जो लाठीचार्ज झाला त्यानंतर मनोज जरांगे हे घरात जाऊन बसले होते. मात्र त्यावेळी राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी त्यांना घरातून उठवून आणलं आणि आंदोलनस्थळी बसवलं. त्यानंतर शरद पवार जाऊन त्यांना भेटले.

- Advertisement -

भुजबळांनी केलेल्या या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार म्हणाले की, भुजबळ मंत्री असून त्यांना सभा घ्याव्या लागत आहेत, याचा अर्थ त्यांचं कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही. तसंच, भुजबळांच्या टीकेला उत्तर मी योग्य वेळी देईन.

रोहित पवार म्हणाले, मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. केंद्र सरकारकडे जाऊन 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण कसं घेता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

- Advertisement -

भुजबळांचा आरोप

मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या लाठीचार्जसंदर्भात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “लाठीचार्ज झाल्यानंतर सरदार ( मनोज जरांगे पाटील) घरात जाऊ बसले. यानंतर आमचे मित्र राजेश टोपे आणि रोहित पवार मनोज जरांगे पाटीलला घरातून रात्री तीन वाजता घेऊन आले. म्हटले की, उपोषणस्थळी बस तिकडे शरद पवार येणार आहेत. मग शरद पवार त्या ठिकाणी गेले. पण मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांना हे सांगितले नाही की, हा लाठीचार्ज का झाला”, असे छगन भुजबळ म्हणाले.

(हेही वाचा: अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात; भुजबळांविरोधात करणार होत्या मोठा खुलासा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -