घरक्रीडाऑस्ट्रेलियन खेळाडूच्या फोनमध्ये लहान मुलांचे अश्लील फोटो-व्हिडिओ, पोलिसांनी केली अटक

ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या फोनमध्ये लहान मुलांचे अश्लील फोटो-व्हिडिओ, पोलिसांनी केली अटक

Subscribe

ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुन्हा एकदा वाईट कृत्यामुळे चर्चेत आलं आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अ‍ॅरॉन समर्स यांच्यावर बाल लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले असून पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली आणि सोमवारी त्याला डार्विन न्यायालयात हजर करण्यात आलं.

अ‍ॅरॉन समर्सच्या मोबाईल फोनमध्ये लहान मुलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळले. नॉर्दर्न टेरिटरीज पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, समर्स असे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी अनेक मुलांशी संपर्क साधत होता. समर्सच्या मोबाइलमध्ये अत्याचाराचे अनेक व्हिडिओ आहेत. आणखी असे अश्लील फोटो घेण्यासाठी समर्स १० मुलांशी संपर्कात असल्याचा पुरावाही आहे. अ‍ॅरॉन समर्सवरला गंभीर आरोपानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

समर्स अलीकडेच अबू धाबी टी 10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून खेळला होता. अ‍ॅरॉन समर्स बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरीकेंसकडून खेळला आहे. याव्यतिरिक्त, तो तस्मानियासाठी वन डे कपही खेळला आहे. तसेच पाकमधील स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला होता.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -