घरदेश-विदेशजगभरात एकदाच वापराच्या ५० टक्के प्लॅस्टिकची निर्मिती अवघ्या २० कंपन्यांकडून - संशोधन

जगभरात एकदाच वापराच्या ५० टक्के प्लॅस्टिकची निर्मिती अवघ्या २० कंपन्यांकडून – संशोधन

Subscribe

जगभरात एकदाच वापराच्या ५० टक्के प्लॅस्टिक कचऱ्याची निर्मिती अवघ्या २० कंपन्यांकडून होत असल्याची माहिती एका संशोधनातून उघड झाली आहे. यामुळे जलप्रदुषणाचा सामना करणाऱ्या देशांसमोरील चिंता अधिकच वाढत आहे. एक्सॉन मोबिस, डॉव केमिकल्स आणि चीन कंपनी सिनोपेक या प्लास्टिक निर्मिती कंपन्यांमध्ये जगभरातील सर्वाधिक प्लास्टिकचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे प्लास्टिक निर्मिती उद्योगातील सर्वाधिक मोठ्या उत्पादक म्हणून या कंपन्यांकडे पाहिले जात आहे. या कंपन्यांमधून जगभरातील १६ टक्के प्लास्टिक कचरा निर्मित केला जात आहे. यात ऑस्ट्रेलिया देशात २०१९ मध्ये प्रति व्यक्ती जवळपास ५९ किलोग्राम एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती करत असल्याचे उघड झाले. त्यामुळे जगभरातील सर्वाधिक प्लास्टिक कचरा ऑस्ट्रेलिया देशातून तयार होत आहे.

दरम्यान सर्वाधिक प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या बहुतांश कंपन्या या एशिया, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्व देशातील आहेत. यातील एक्सॉन मोबिल कंपनीतून जगभरातील ५.९ मिनियन टन प्लास्टिक कचरा बाहेर येत आहे. त्यामुळे ही कंपनी प्लास्टिक कचरामुळे प्रदुषण निर्माण करणाऱ्या यादीत अग्रस्थानी आहे. यानंतर अमेरिकेतील डॉव केमिकल्समध्ये जवळपास ५.५ मिलियन टन प्लास्टिक कचरा तयार होत असून तिसऱ्या स्थानी चीनमधील सिनोपेक कंपनीचा नंबर लागतो. सिनोपेक कंपनीतून ५.३ मिलियन टन प्लास्टिक कचरा बाहेर बडत आहे.

- Advertisement -

दरम्यान एंड्रॉ अँड निकोला फॉरेस्ट मिंडेरु फाऊंडेशनने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, जगभरातील अशा १०० कंपन्या आहेत त्यामाध्यमातून ९० टक्के प्लास्टिक कचऱ्याची निर्मित होत आहे. यातील एकदा वापर केलेल्या प्लास्टिक कचऱ्यामधील फक्त १० ते १५ टक्केच प्लास्टिकचे रिसाइक्लिन केले जात असून इतर प्लास्टिक कचरा पर्यावरणात सोडला जात आहे. या कचऱ्यात मास्क, आणि प्लास्टिक बॅगचा समावेश आहे. दरम्यान हे प्लास्टिक एकदा वापऱ्यानंतर फेकून दिले जाते परंतु फेकुन दिलेले हे प्लास्टिक समुद्र आणि महासागरात जाऊन अडकत आहे. त्यामुळे घातक वायुप्रदुषणाचा धोका वाढतोय.

द गार्डियन रिपोर्टच्या लेखकांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हा वाढणारा सिंगल युज प्लास्टिक कचरा पर्यावरणाला नष्ट होण्याचा एक इशारा देत आहे. परिणामस्वरुप बहुतांश विकसशील देशांतील एकदा वापरला जाणारा प्लास्टिक कचऱ्याचे खराब व्यवस्थापन देशातील पर्यावरण साधनसंपत्ती नष्ट करण्यास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान फाउंडेशनने असाही खुलासा केली की, जगभरातील प्लास्टिक कचरा कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये पारदर्शकता नसल्याने प्रयत्न अपयशी ठरत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस प्लास्टिक कचऱ्याचा वापर आणि उत्पादनाची वृद्धी वाढत आहे.

- Advertisement -

फाउंडेशनने जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये असेही सांगितले आहे की, प्रत्य़ेक महिन्याला १ मिलियन टनहून अधिक प्लास्टिक कचरा जगभरातील अनेक नदी, नाले, महासागरात प्रवेश करत आहे. परंतु हा कचरा कमी करण्यासाठी सरकारकडून अब्ज कोटी रुपये खर्च केले जातात. त्याचवेळी, प्लास्टिक उत्पादक, वापरकर्त्यांमधील प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु प्लास्टिक कचरा गोळा करणे आणि त्याचा पुनर्वापर वाढविण्यासह, प्लास्टिक उद्योग पद्धतीमध्ये बदलण्यासंदर्भात जागतिक प्रयत्नांमधील अपारदर्शकतेमुळे अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी केले जाणारे प्रयत्नही अपयशी ठरत आहेत.

भारतात एकदा वापरले जाणारे प्लास्टिक

पर्यावरण मंत्रालयाने मार्चमध्ये एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे उत्पादनावर, वापर, विक्री, आयात आणि हाताळणीवर बंदी आणण्यासाठी नवीन कायदा तयार केले. ज्यासाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (दुरुस्ती) नियम, २०२० चा मसुदा तीन टप्प्यात लागू करून २०२२ पर्यंत पूर्ण अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे. सप्टेंबरमध्ये सुरू होणार्‍या पहिल्या टप्प्यात केंद्राने असा प्रस्ताव दिला आहे की प्लास्टिकपासून बनवलेल्या प्लास्टिक कॅरी बॅगची जाडी ६० – २४० मायक्रॉनपेक्षा कमी नसावी. तर जानेवारी २०२२२ पासून सुरू होणार्‍या दुसर्‍या टप्प्यात प्लास्टिकच्या सहा प्रकारांवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे आणि जुलै २०२० या तिसर्‍या टप्प्यापर्यंत ही यादी आणखी वाढवली जाईल. नवीन तयार केलेल्या मसुद्याच्या नियमांनुसार एकदा वापरल्य़ा जाणाऱ्या प्लास्टिकची व्याख्या अशी आहे की “प्लास्टिकची वस्तू जेव्हा त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी किंवा पुनर्वापर करण्यापूर्वी एकाच कारणासाठी एकदा वापरली जाते”.

 


केवळ ३३० रुपये वार्षिक प्रीमियम भर मिळवा 2 लाखांचा विमा, जाणून घ्या मोदी सरकारची योजना

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -