घरक्रीडाT20 WC : भारत पाकिस्तान सामन्याअगोदरच हे ४ खेळाडू परतले मायदेशी....

T20 WC : भारत पाकिस्तान सामन्याअगोदरच हे ४ खेळाडू परतले मायदेशी….

Subscribe
आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषकातील भारत विरूध्द पाकिस्तानचा महालढतीचा सामना आज होणार आहे. पण त्याच्या अगोदरच भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे ( BCCI ) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. BCCI ने भारतीय संघाच्या यादीत समाविष्ट असलेल्या ४ अतिरिक्त खेळाडूंना स्वदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ४ खेळाडूंना स्वदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात गोलंदाज शाहबाज नदीम, कृष्णप्पा गौतम, कर्ण शर्मा, आणि व्यंकटेश अय्यरचा समावेश आहे. टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून BCCI ने फलंदाजीच्या तयारीसाठी ८ गोलंदाज निवडले होते. यूएईतून माघारी परतलेले हे चारही खेळाडू येणाऱ्या सर्व स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळणार असून सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये देखील खेळणार आहेत.

BCCI कडून वेगवान गोलंदाजांवर भर.. 

ह्या ४ खेळाडूंना मायदेशी पाठवल्यानंतर उमरान मलिक, आवेश खान, हर्षल पटेल, आणि लुकमान मेरिवाला या गोलंदाजांचे भारतीय संघातीय संघातील स्थान कायम ठेवले आहे. BCCI कडून वेगवान गोलंदाजांवर जास्त भर दिल्याचे पहायला मिळत आहे. BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी पीटीआय वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार विश्वचषक चालू झाल्यानंतर जास्तवेळ सराव करता येणार नाही म्हणून ह्या ४ गोलंदाजांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळता यावे म्हणून स्वदेशी पाठवले आहे, सैयद अली टी ट्वेंटी स्पर्धेची सुरूवात ४ नोव्हेंबर पासून होणार आहे.

हर्षल पटेल होता IPL 2021 चा पर्पल कॅप होल्डर 

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या हंगामात आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने सर्वाधिक ३२ बळी घेतले होते. त्याच्या नंतर दिलली कॅपिटल्सचा गोलंदाज आवेश खानचा नंबर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातच जम्मू कश्मीरचा रहिवाशी असलेल्या उमरान मलिकने सर्वाधिक वेगाने चेंडू फेकून सर्वांनाच प्रभावित केले, ह्या हंगामात सर्वात वेगाने गोलंदाजी करण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -