नो हेल्मेट, नो पेट्रोल आदेशाचे उल्लंघन; पंचवटीतील तीन पेट्रोलपंपांना नोटिसा

पंचवटीतील तीन पेट्रोल पंपावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या नो हेल्मेट, नो पेट्रोल आदेशाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गांधी, पालीजा आणिखालसा या तीन पेट्रोलपंपांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुमचे ना हरकत प्रमाणपत्र का रद्द करु नये, अशी पोलिसांनी विचारणा केली आहे. या कारवाईमुळे नो हेल्मेट, नो पेट्रोल आदेशाचे उल्लंघन करणार्‍या शहरातील पेट्रोल पंपचालकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय यांनी शहरात नो हेल्मेट, नो पेट्रोल’ही मोहीम सुरु केली आहे. विनाहेल्मेट दुचाकीचालकांना पेट्रोल देवू नये, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, अनेक पेट्रोल पंपचालक आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तीन पेट्रोल पंपांवर धडक कारवाई करुन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.