घरक्रीडाभारताला न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश; न्यूझीलंडने ७ गडी राखत मिळवला विजय

भारताला न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश; न्यूझीलंडने ७ गडी राखत मिळवला विजय

Subscribe

१६ गडी बाद; भारताला ९७ धावांची आघाडी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस गोलंदाजांचा ठरला. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक मार्‍यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला आणि भारताला ७ धावांची आघाडी मिळाली. भारताच्या फलंदाजांनी मात्र पुन्हा एकदा निराशाच केली. आघाडीच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे दुसर्‍या दिवसअखेर भारताची दुसर्‍या डावात ६ बाद ९० अशी अवस्था होती. त्यामुळे भारताकडे ९७ धावांची आघाडी होती. दुसर्‍या दिवशी दोन्ही संघांनी मिळून तब्बल १६ विकेट गमावल्या.

भारताने पहिल्या डावात २४२ धावा केल्या होत्या, ज्याचे उत्तर देताना पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडची बिनबाद ६३ अशी धावसंख्या होती. दुसर्‍या दिवसाच्या तिसर्‍याच षटकात उमेश यादवने टॉम ब्लंडेलला ३० धावांवर पायचीत पकडत न्यूझीलंडला पहिला झटका दिला. कर्णधार केन विल्यमसनला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्याला ३ धावांवर बुमराहने यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. तर डावखुरा फिरकीपटू रविंद्र जाडेजाने अनुभवी रॉस टेलरला १५ धावांवर माघारी पाठवले. टॉम लेथमने मात्र एक बाजू लावून धरत ११९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण शमीने ५२ धावांवर त्याचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडला आणखी एक झटका दिला.

- Advertisement -

शमीनेच मग हेन्री निकोल्सला (१४) विराट कोहलीकरवी झेलबाद केले. त्यामुळे लंचच्या वेळी न्यूझीलंडची ५ बाद १४२ अशी अवस्था होती. भारताने पुढेही अप्रतिम गोलंदाजी सुरु ठेवली. बुमराहने एकाच षटकात बीजे वॉटलिंग आणि टीम साऊथीने यांना खातेही न उघडता माघारी पाठवले. यानंतर कायेल जेमिसन (४९), कॉलिन डी ग्रँडहोम (२६) आणि निल वॅग्नर (२१) यांनी संयमाने खेळत न्यूझीलंडला दोनशे धावांचा टप्पा पार करुन दिला. अखेर जेमिसनला शमीने बाद करत न्यूझीलंडचा डाव २३५ धावांवर संपवला.

भारताच्या दुसर्‍या डावाचीही अडखळती सुरुवात झाली. त्यांचे सलामीवीर मयांक अगरवाल (३) आणि पृथ्वी शॉ (१४) झटपट माघारी परतल्याने नवव्या षटकात भारताची २ बाद २६ अशी अवस्था झाली. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार कोहलीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोहलीला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. ३० चेंडूत १४ धावा केल्यावर त्याला डी ग्रँडहोमने पायचीत पकडले. वॅग्नर आणि जेमिसन यांनी उसळी घेणारे चेंडू टाकत उपकर्णधार अजिंक्य रहाणेला चांगलेच सतावले. दोन वेळा चेंडू त्याच्या हेल्मेटलाही लागला. अखेर वॅग्नरच्या गोलंदाजीवर पूल मारण्याच्या नादात तो ९ धावांवर बाद झाला. तर पुजारा (२४) आणि नाईट वॉचमन म्हणून आलेल्या उमेशचा (१) डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्रिफळा उडवत भारताला आणखी दोन झटके दिले. त्यामुळे दिवसअखेर भारताची दुसर्‍या डावात ६ बाद ९० अशी अवस्था होती.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलकभारत : २४२ आणि ६ बाद ९० (पुजारा २४, कोहली १४, शॉ १४; बोल्ट ३/१२) वि. न्यूझीलंड : पहिला डाव सर्वबाद २३५ (लेथम ५२, जेमिसन ४९, ब्लंडेल ३०; शमी ४/८१, बुमराह ३/६२).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -