घरक्रीडाFIFA 2018 : ब्राझीलचा कोस्टा-रिकावर २-० ने विजय

FIFA 2018 : ब्राझीलचा कोस्टा-रिकावर २-० ने विजय

Subscribe

अतिरिक्त वेळेत गोल केल्यामुळे ब्राझीलच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला कुटिन्हो

नुकत्याच झालेल्या ई गटातील ब्राझीलविरूद्ध कोस्टा-रिका सामन्यात अतिरिक्त वेळेत ब्राझीलने दोन गोल करत अप्रतिम विजय मिळवला आहे. सामन्याची ९० मिनिटे पूर्ण झाल्यानंतरही दोन्ही संघांचा एकही गोल झाला नव्हता. मात्र अतिरिक्त मिळालेल्या वेळेत ब्राझीलने दोन गोल करून विजय आपल्या नावे केला आहे.

countinho
अतिरीक्त वेळेतील गोलमिळे सामन्यातील विजयाचा शिल्पकार कुटिन्हो

सुरूवातीपासूनच सामना अत्यंत अटीतटीचा झाला. हाफ टाईमआधी दोन्ही संघाकडून काही आक्रमणे केली गेली. मात्र कोणालाही यश आला नाही. नेयमारवर सर्वांचेच लक्ष होते मात्र त्याच्याकडून काही खास कामगिरी होत नव्हती. हाफ टाईम झाला तरी दोन्ही संघांचा स्कोर ०-० होता. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. परंतु दोघांनाही यश येत नव्हते. अगदी ९० मिनिटं झाली तरीही स्कोर ०-० होता. त्यामुळे अतिरीक्त ६ मिनिटे देण्यात आली आणि ९१व्या मिनिटाला कुटिन्होने गोल केला आणि सामना ब्राझीलच्या नावे केला. यानंतर अतिरिक्त वेळेच्या अगदी शेवटच्या ९७व्या मिनिटाला नेयमारने गोल करून सर्व ब्राझिलियन्सचा आनंद द्विगुणित केला. या विजयाने ब्राझील ई गटात अव्वलस्थानी पोहचली आहे.

- Advertisement -
neymar
ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमार

कोस्टा-रिकाचा प्रवास संपुष्टात

स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सर्बियाकडून १-० ने पराभवानंतर आजचा सामना जिंकणे कोस्टा-रिकाला अनिवार्य होते. मात्र अतिरिक्त वेळेत ब्राझीलने दोन गोल करत सामन्यात विजय मिळवला आणि यासोबतच कोस्टा-रिकाचा या विश्वचषकातील प्रवास संपला. ई गटाच्या गुणतालिकेत सर्वात खाली राहिल्याने कोस्टा-रिकाला या स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे.

costa rica team
कोस्टा-रिकाचा संघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -