घरक्रीडाIND vs SA : ओमिक्रॉन व्हेरिएंटने वाढवले BCCI चे टेंन्शन; भारताचा दक्षिण...

IND vs SA : ओमिक्रॉन व्हेरिएंटने वाढवले BCCI चे टेंन्शन; भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार?

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रोन विषाणूचा परिणाम क्रिकेटवर देखील होताना दिसत आहे

कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रोन विषाणूचा परिणाम क्रिकेटवर देखील होताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका सर्वत्र पसरत असताना यावर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत मोठी माहिती दिली आहे. एका वृत्तवाहिनीला माहिती देताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हंटले की, “ओमिक्रोनच्या वाढच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला जाऊ शकतो”. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार भारताचा हा दौरा एक आठवड्यासाठी पुढे ढकलला जाऊ शकतो. मात्र बीसीसीआय भारत सरकारच्या परवानगीची वाट बघत आहे. यानंतर निर्णय होईल की भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार की नाही.

दरम्यान, भारताच्या या दौऱ्यातील नियोजनात देखील बदल केला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार खेळाडूंचे आरोग्य आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. तर क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी देखील स्पष्ट केले होते की, भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयला भारत सरकारच्या परवानगीची वाट पहावी लागेल. तिकडे वाढत असलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान दोन्ही संघात ३ कसोटी, ३ एकदिवसीय, आणि ४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि भारतामधील पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरला नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. तर तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ७ जानेवारी २०२२ ला समाप्त होईल. दरम्यान यानंतर ११, १४ आणि १६ तारखेला ३ एकदिवसीय सामने पार पडतील तर १९, २१, २३ आणि २६ जानेवारीला टी-२० सामने होणार आहेत.


हे ही वाचा: http://Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठी या ७ खेळाडूंची घोषणा; क्रीडामंत्री अनुराग ठाकुरांनी दिली माहिती

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -