घरक्रीडाCristiano Ronaldo Football : रोनाल्डो पुन्हा सात क्रमांकाच्या जर्सीत

Cristiano Ronaldo Football : रोनाल्डो पुन्हा सात क्रमांकाच्या जर्सीत

Subscribe

मॅन्चेस्टर कडुन पुन्हा एकदा सात क्रमांकाची जर्सी परिधान करुन खेळताना दिसनार

पोर्तुगालचा जग प्रसिध्द फुटबॉल खेळाडू ३६ वर्षीय रोनाल्डो २००३ ते २००९ अशी सहा वर्ष मँचेस्टर युनायटेड या क्लबकडून खेळताना २९२ सामन्यांत ११८ गोल्स केले आहेत. पुन्हा एकदा तो मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबमध्ये दाखल झाला आहे. रोनाल्डो याने पुढील दोन वर्षांसाठी या क्लब बरोबर करार केला आहे. आख्या जगभर रोनाल्डोच्या लाईफस्टाईल बद्दल चर्चा केली जाते तसेच त्याच्या खेळाकडेही सर्वांचे लक्ष असते. तो ज्या क्रमांकाची जर्सी परीधान करोतो या कडे त्याचे चाहते खुपच आकर्षित असतात. त्याची सात क्रमांकाची जर्सी ही खुप लोकप्रिय आहे.

- Advertisement -

त्यामुळेच रोनाल्डो पुन्हा एकदा मॅन्चेस्टर कडुन सात क्रमांक जर्सी परिधान करुन खेळताना दिसनार आहे. मँचेस्टर युनायटेडसह प्रीमियर लीगमध्ये पुनरागमन करताना ख्रिस्तियानो रोनाल्डो सात व्या क्रमांकाची जर्सी परिधान करेल. इंग्लिश क्लबने शुक्रवारी अधिकृतपणे ही घोषणा केली. पोर्तुगीज उस्ताद उरुग्वेयन स्ट्रायकर एडिसन कवानी कडून नंबर सात ची जर्सी घेईल एडिसन कवानी २१ क्रमांकाची जर्सी परिधान करेल, तीच तो त्याच्या राष्ट्रीय संघासाठी परिधान करतो.

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा आवडता आणि त्याचा लोकप्रिय जर्सी क्रमांक परत मिळवणे रोनाल्डोसाठी काही सोपे नव्हते परंतु प्रीमियर लीगचा नियम पहाता रोनाल्डोच्या मार्गात मोठा अडथळा उभा राहिला. नियमानुसार असे म्हंटले जाते की एकदा हंगाम सुरू झाला की जर्सी क्रमांक बदलता येत नाही आणि हे घडण्यासाठी युनायटेडला प्रीमियर लीग बोर्डाकडून विशेष अनुमती मिळवावी लागले, जे यापूर्वी कधीही दिले गेले नव्हते. पण रोनाल्डो नेहमीच प्रमुख खेळाडू राहिला आहे. आणि खूप विचारविनिमयानंतर युनायटेड प्रीमियर लीग बोर्डला शेवटी हार पत्करावी लागली.

- Advertisement -

हेही वाचा : Tokyo 2020 Paralympics: देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; उंच उडीत प्रवीण कुमारला रौप्य पदक

Tokyo Paralympics: अवनी लेखराने रचला इतिहास, सुवर्णपदकानंतर कांस्य पदकाची कमाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -