घरक्रीडाइंग्लिश प्रीमियर लीग : चेल्सी-लिव्हरपूल सामना बरोबरीत सुटला

इंग्लिश प्रीमियर लीग : चेल्सी-लिव्हरपूल सामना बरोबरीत सुटला

Subscribe

इंग्लंडमधील दोन बलाढ्य संघ चेल्सी आणि लिव्हरपूल यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत संपला. चेल्सीसाठी इडन हजार्डने तर लिव्हरपूलसाठी डॅनियल स्टरिजने गोल केला.

चेल्सी आणि लिव्हरपूल यांच्यातील इंग्लिश प्रीमियर लीगचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. या सामन्यात चेल्सीसाठी इडन हजार्डने तर लिव्हरपूलसाठी डॅनियल स्टरिजने गोल केला. या दोन्ही संघांनी इंग्लिश प्रीमियर लीगच्या या मोसमात अजून एकही सामना गमावलेला नाही.

इडन हजार्डचा आणखी एक गोल 

या सामन्यात दोन्ही संघानी चांगली सुरुवात केली. त्यामुळे या सामन्यात कोणत्याही संघाला गोल करण्याची संधी सहजासहजी मिळत नव्हती. लिव्हरपूलच्या स्टार खेळाडू मोहम्मद सलाहला गोल करण्याची संधी मिळाली पण त्याला गोल करण्यात अपयश आले. सामन्याच्या २५ व्या मिनिटाला माटेओ कोवाचीचच्या पासवर गोल करत इडन हजार्डने चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सलाहला गोल करण्याची आणखी एक संधी मिळाली. पण त्याने मारलेला शॉट चेल्सीचा डिफेंडर अँटोनियो रुडिगाने अडवला. त्यामुळे मध्यंतरापर्यंत चेल्सीने या सामन्यात १-० ची आघाडी ठेवली.

स्टरिजच्या अप्रतिम गोलमुळे लिव्हरपूलची बरोबरी

मध्यंतरानंतर लिव्हरपूलने आक्रमक खेळ केला. त्यामुळे त्यांना गोल करायच्या संधी मिळाल्या. पण चेल्सीचा गोलकीपर केपाने चांगला खेळ केल्याने लिव्हरपूलला गोल करता आला नाही. तर दुसरीकडे हजार्डला गोल करण्याची सुवर्ण संधी मिळाली पण त्याने मारलेला शॉट लिव्हरपूलचा गोलकीपर ऍलिसनने अडवला. पण सामना संपण्यासाठी १ मिनिट बाकी असताना लिव्हरपूलसाठी डॅनियल स्टरिजने अप्रतिम गोल केला. त्यामुळे हा सामना बरोबरीत संपला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -