घरमहाराष्ट्रआदिवासी समाजाला डिसेंबर अखेरपर्यंत वनजमिनी - मुख्यमंत्री

आदिवासी समाजाला डिसेंबर अखेरपर्यंत वनजमिनी – मुख्यमंत्री

Subscribe

राज्यातील आदिवासी समाजाला डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत वनजमीन पट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शिर्डी येथील वीर राघोजी भांगरे नगर येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.

राज्यातील आदिवासी समाजाला डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत वनजमीन पट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शिर्डी येथील वीर राघोजी भांगरे नगर येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष जगदेवराम ओराम, मेघालयचे माजी राज्यपाल रणजीत शेखर मुशाहारी, महंत रामगिरीजी महाराज, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने विविध निर्णय घेतले आहेत. आदिवासी क्षेत्रात विविध विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला सक्षम बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पेसा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून, त्यानुसार पाच टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे.  आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासींना जमीन अधिकार प्राप्त व्हावा, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, डिसेंबर अखेरीस जमीन पट्टे देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

क्रीडा प्रकारातही समाजातील मुलींचं नाव

देशात विविध भाषा, परंपरा आहेत. मात्र विविधतेतून एकता हे देशाचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य जपत वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षण आणि संस्कृतीच्या प्रसारात महत्त्वाचे योगदान दिले आहे. ब्रिटिशांनी शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या वनवासी समाजाला वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षणाशी जोडले. त्यांच्या मूलभूत क्रीडा कौशल्याला वाव दिला. त्यामुळे विविध क्रीडा प्रकारांत या समाजातील तरुण-तरुणी देशाचे नाव उंचावताना दिसत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


हेही वाचा – मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कारवाई होईल – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -