घरक्रीडाShane Warn : शेन वॉर्नच्या बाईकला मोठा अपघात, मुलगाही अपघातग्रस्त

Shane Warn : शेन वॉर्नच्या बाईकला मोठा अपघात, मुलगाही अपघातग्रस्त

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक शेन वॉर्नचा अपघात झाला आहे

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक शेन वॉर्नचा अपघात झाला आहे. शेन वॉर्न त्याच्या मुलासोबत मोटारसायकलवरून जात असताना मोटारसायकल घसरली आणि हा अपघात झाला. आस्ट्रेलियातील माध्यमांच्या माहितीनुसार, हा अपघात २८ नोव्हेंबर म्हणजेच रविवारीच झाला होता. ५२ वर्षीय शेन वॉर्नला गंभीर दुखापत झाली नसली तरी त्याने सांगितले की त्याची दुखापत मोठी आहे आणि याचा त्याला खूप त्रास होत आहे. अपघातानंतर शेन वॉर्न पूर्ण शरीर तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये देखील गेला. शेन वॉर्नने अपघातानंतर सांगितले की तो पूर्णपणे दुखावला गेला आहे.

मात्र, ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अॅशेस मालिकेला शेन वॉर्न हजर राहणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. शेन वॉर्न अॅशेस मालिकेसाठी समालोचक टिमचा हिस्सा आहे. तर ८ डिसेंबरपासून गाबा येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तो सहभागी होणार आहे. वॉर्नच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर तो सध्या जगातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा फलंदाज आहे.

- Advertisement -

शेन वॉर्न एक आक्रमक फिरकीपटू म्हणून ऑस्ट्रेलियातच नाही तर संपूर्ण जगभर प्रसिध्द आहे. शेन वॉर्नच्या नावावर कसोटी सामन्यात एकूण ७०८ बळींची नोंद आहे. तर त्याने एकदिवसीय सामन्यात २९३ बळी घेतले आहेत. शेन वॉर्नने त्याच्या कारकिर्दीत ३८ वेळा ५ बळी पटकावले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे लोकप्रिय अॅशेस मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान यावेळी अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होत आहे. मोठ्या वादविवादानंतर ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला संघाचा कर्णधार बनवला आहे.


हे ही वाचा: http://IND vs NZ Test series : पुजारा की रहाणे? खराब फॉर्ममुळे मुंबई कसोटीत कुणाचा पत्ता कट?

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -