घरIPL 2020IPL 2020 : मला जे मिळायला हवे होते, ते नाही मिळाले -...

IPL 2020 : मला जे मिळायला हवे होते, ते नाही मिळाले – अमित मिश्रा

Subscribe

मिश्राने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १५० हून विकेट घेतल्या आहेत. 

भारताचा अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्रा आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत असतो. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मिश्रा दुसऱ्या स्थानावर असून त्याने आतापर्यंत १४८ सामन्यांत १५७ गडी बाद केले आहेत. तसेच तो स्थानिक क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत असतो. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १५० हून विकेट घेतल्या आहेत. मात्र, असे असले तरी त्याला भारतीय संघात सातत्याने संधी मिळत नाही आणि याची खंत मिश्राने व्यक्त केली. ‘मला जे मिळायला हवे होते, ते मिळाले नाही,’ असे मिश्रा म्हणाला.

मी पूर्वी खूप विचार करायचो

लोक माझा गांभीर्याने विचार करत नाहीत का? हे मला माहित नाही. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, माझ्याबद्दल काय बोलतात, याचा मी पूर्वी खूप विचार करायचो. याचा माझ्या कामगिरीवर परिणाम व्हायचा. मात्र, आता मी केवळ माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. अगदी खरे सांगायचे तर, मला जे मिळायला हवे होते, ते मिळाले नाही. मात्र, याचे मला दुःख नाही. लोकांना अमित मिश्रा कोण हे ठाऊक आहे आणि हे माझ्यासाठी पुरेसे आहे. मी आता केवळ माझ्या खेळाचा विचार करतो. मी कशाप्रकारे गोलंदाजी केली पाहिजे यावर लक्ष देतो, असे मिश्रा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीविषयी म्हणाला.

- Advertisement -

अखेरच्या सामन्यात ५ विकेट   

मिश्रा हा गेली बरीच वर्षे भारतातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असला तरी त्याने २०१६ नंतर कसोटी किंवा एकदिवसीय सामना खेळलेला नाही. त्याने त्याच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांत ५ विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. तर त्याने २०१७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -