घरक्रीडाTest Rankings : कोहली ‘जैसे थे’च; विल्यमसनची पुन्हा अव्वल स्थानी झेप

Test Rankings : कोहली ‘जैसे थे’च; विल्यमसनची पुन्हा अव्वल स्थानी झेप

Subscribe

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील कामगिरीचा विल्यमसनला फायदा झाला.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. विल्यमसनच्या नेतृत्वात नुकतेच न्यूझीलंडने भारताला पराभूत करत पहिलेवहिले ‘टेस्ट चॅम्पियन’ होणाऱ्या मान पटकावला होता. साऊथहॅम्पटन येथे झालेल्या या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विल्यमसनने ४९ आणि नाबाद ५२ धावांची खेळी करत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याचा त्याला फायदा झाला असून त्याने कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. विल्यमसनचे आता ९०१ गुण झाले असून दुसऱ्या स्थानावरील स्टिव्ह स्मिथचे ८९१ आणि तिसऱ्या स्थानावरील मार्नस लबूशेनचे ८७८ गुण आहेत.

- Advertisement -

रोहित शर्माला एका स्थानाची बढती

भारताचा कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानी कायम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात कोहलीने पहिल्या डावात ४४ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात मात्र तो केवळ १३ धावा करून बाद झाला. मात्र, त्याने कसोटी क्रमवारीत चौथे स्थान राखले असून त्याच्या खात्यात ८१२ गुण आहेत. भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला एका स्थानाची बढती मिळाली असून तो ७५९ गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

अव्वल दहा गोलंदाजांमध्ये केवळ एक भारतीय 

गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडच्या कायेल जेमिसनने कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ वे स्थान पटकावले आहे. त्याने अंतिम सामन्यात पहिल्या डावात ५ विकेट आणि दुसऱ्या डावात २ विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. याचा त्याला कसोटी क्रमवारीत फायदा झाला आहे. तसेच ट्रेंट बोल्टला दोन स्थानांची बढती मिळाली असून तो ११ व्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आपले दुसरे स्थान राखले आहे. अव्वल दहा गोलंदाजांमध्ये तो एकमेव भारतीय आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -