घरक्रीडाICC World Cup 2019: विश्वचषक क्रिकेटचा सामना आजपासून रंगणार

ICC World Cup 2019: विश्वचषक क्रिकेटचा सामना आजपासून रंगणार

Subscribe

केनिंग्टन ओव्हलवर होणार्‍या इंग्लंडपुढे विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज म्हणजेच गुरूवारी १२ व्या आयसीसी ‘विश्‍वचषक क्रिकेट-२०१९’ सामना होणार आहे. केनिंग्टन ओव्हलवर होणार्‍या इंग्लंडपुढे विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. विश्‍वविजेता असलेला देश ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड यांच्यासह भारत, इंग्लंड, द. आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगला देश, श्रीलंका व अफगाणिस्तान हे जगातील अव्वल दहा संघ ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनण्यासाठी जिवाच्या आकांतासह ‘जिंकू किंवा मरू’, अशा दृढ निश्चयाने मैदानात उतरणार आहे.

एकूण १५० खेळाडू आणि १० संघांतील लढती वन-डे क्रिकेट विश्वचषकच्या निमित्ताने ब्रिटनमध्ये आज, गुरुवारपासून अनुभवायला मिळणार आहेत. या एक – दिड महिन्याच्या कालावधीत क्रिकेट स्पर्धेच्या वाटचालीत कोण अखेरपर्यंत तग धरुन रहणार का? याकडेच साऱ्या क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. या विश्वचषक स्पर्धेची सुरूवात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज होणाऱ्या लढतीने होणार आहे.

- Advertisement -

बदलेले विश्वचषकाचे स्वरूप

  • आता प्रत्येक संघाला नऊ सामने खेळायला मिळणार आहेत.
  • त्यातील चार संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करता येणार आहे.
  • ९ आणि ११ जुलैला उपांत्य सामने रंगणार असून १४ जुलैला अंतिम सामना खेळविला जाईल.
  • उपांत्य फेरीसाठी एखाद्या संघाला नऊपैकी किमान पाच सामने जिंकावे लागतील.

भारताने १९८३ तसेच २०११ मध्ये विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारताकडून अनेक आपेक्षा उंचावल्या आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे संघही विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेशी ५ जूनला होणार असून१६ जूनला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीच्या सामन्याचे विशेष आकर्षण क्रिकेट चाहत्यांना आहे.

अशा असणार भारताच्या वर्ल्डकपमधील लढती

  • ५ जून
    दक्षिण आफ्रिका (साऊदम्प्टन)
  • ९ जून
    ऑस्ट्रेलिया (ओव्हल)
  • १३ जून
    न्यूझीलंड (नॉटिंगहॅम)
  • १६ जून
    पाकिस्तान (मँचेस्टर)
  • २० जून
    अफगाणिस्तान (साऊदम्प्टन)
  • २७ जून
    वेस्ट इंडिज (मँचेस्टर)
  • ३० जून
    इंग्लंड (बर्मिंगहॅम)
  • २ जुलै
    बांगलादेश (बर्मिंगहॅम)
  • ६ जुलै
    श्रीलंका (लीड्स)

या स्पर्धेत एकूण ४८ सामने खेळविले जाणार असून, १४ जुलै रोजी होणार्‍या अंतिम सामन्यात बाजी मारणारा संघ १२ वा विश्‍वविजेता संघ बनेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -