घरक्रीडाInd Vs Afg T-20 : विराटची एंट्री; टीम इंडिया Series खिशात घालण्याच्या...

Ind Vs Afg T-20 : विराटची एंट्री; टीम इंडिया Series खिशात घालण्याच्या तयारीत

Subscribe

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना भारतविरुद्ध अफगाणिस्तानमध्ये मोहाली स्टेडियमवर खेळला गेला. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचेही टी-20 संघात पुनरागमन झाले आहे.

इंदूर : अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या तीन टी-20 सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना आज मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये आज रविवारी (14 जानेवारी) सायंकाळी सात वाजता खेळविल्या जाणार आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहलीची एंट्री झाली असून, विराटच्या हजेरीत टीम इंडिया तीन टी-20 सामन्याची मालिका खिशात घालण्याच्या तयारीत आहेत. (Ind Vs Afg T-20 Virat entry Team India is preparing to pocket the series)

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना भारतविरुद्ध अफगाणिस्तानमध्ये मोहाली स्टेडियमवर खेळला गेला. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचेही टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. विराट वैयक्तिक कारणांमुळे पहिला सामना खेळला नाही. मात्र, आज दुसऱ्या सामन्यांत विराटची एंट्री झाली असून, तो दुसरा सामना खेळण्याची शक्यता आहे. तर अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पाच गडी गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 17.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. तर आज इंदूरमध्ये होणारा दुसरा सामना जिंकून टीम इंडिया मालिका खिशात घालणार का? हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आमदार, खासदारांच्या संख्येवर पक्षाचे स्वामित्व कसे ठरवणार? Sanjay Raut यांचा ‘रोखठोक’ सवाल

विराट ठोकणार अफगाणिस्तानच्या गोलंदाजाना

विराट कोहली आणि रोहित शर्मा शेवटचे 2022 टी-20 विश्वचषकात खेळले होते. यानंतर, हे दोन्ही क्रिकेटपटू जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या योजनेचा भाग नव्हते. अचानक या दोघांना अफगाणिस्तानविरुद्धच्या संघात स्थान देण्यात आले. यामुळेच विराट या सामन्यात धावा करून टीकाकारांना उत्तर देण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. या अफगाणिस्तान विरुद्ध त्याने आपले एकमेव T20 आंतरराष्ट्रीय शतकही झळकावले आहे. विराटच्या पुनरागमनानंतर टिळक वर्मा संघात राहतात की त्याला वगळले जाते हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Parliament Security Breach : संसद घुसखोरीचा मास्टरमाइंड मनोरंजन डी! Narco Test मधून माहिती समोर

मुजीब उर रहमान ठरतोय घातक

राशिद खान अफगाणिस्तान संघात नसला तरी या संघाला हलक्यात घेता येणार नाही. मुजीब उर रहमानने गेल्या सामन्यात 21 धावांत दोन बळी घेत आपल्याविरुद्ध धावा करणे सोपे नाही हे दाखवून दिले. वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि फजलहक फारुकी यांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही, परंतु हे दोघेही त्यांच्या दिवशी धोकादायक आहेत. चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी कर्णधार इब्राहिम झद्रान आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्यावर असेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -