घरदेश-विदेशRam Mandir लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना मिळणार 'रामरज', वाचा सविस्तर

Ram Mandir लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना मिळणार ‘रामरज’, वाचा सविस्तर

Subscribe

यावेळी पंतप्रधान मोदी हे राम मंदिराच्या परिसरात असलेल्या कुबेर नवरत्न टेकडीलाही भेट देणार असून पक्षी राजा जटायूच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरणही होणार आहेत.

लखनऊ : अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे. राम मंदिराच्या लोकार्पणासाठी अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहे. या सोहळ्याची तयारी अयोध्येसह देभरात सुरू आहे. या सोहळ्यासाठी राज जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने आतापर्यंत 11 हजारहून अधिक पाहुण्यांना निमंत्रण दिले आहे. यावेळी राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्व पाहुण्यांना भेट म्हणून ‘रामरज’ देण्यात येणार आहे. तसेच प्रसाद म्हणून पाहुण्यांना तुपात बनवलेले मोतीचूर लाडू देण्यात येणार आहे.

राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांना मंदिराच्या उभारणीवेळी पाया खोदताना काढण्यात आलेली माती (रामरज) म्हणून भेट देणार आहे. या ‘रामरज’ हे लहान खोक्यात पॅक करून पाहुण्यांना देण्यात येणार असल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टशीने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सर्वात तरुण खासदार बनून राजकारणात छाप पाडणारे Milind Deora आहेत कोण?

या सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना देण्यात येणारे ‘रामरज’ ते घरात ठेवू शकतात. या ‘रामरज’ घरात ठेवल्याने सुख, समृद्धी आणि आनंद येईल, अशी माहिती ट्रस्टच्या सदस्याने दिली आहे. या सोहळ्याला ज्यांना अनुपस्थित असतील, त्यांना नंतर राम मंदिराला भेट दिल्यानंतर ‘रामरज’ देण्यात येईल, असेही राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Shrikant Shinde यांच्या उमेदवारीमुळेच पक्षाला एक जागा जिंकता आली – CM Eknath Shinde

पंतप्रधानांच्या हस्ते जटायूच्या पुतळ्याचे होणार अनावरण

यावेळी पंतप्रधान मोदी हे राम मंदिराच्या परिसरात असलेल्या कुबेर नवरत्न टेकडीलाही भेट देणार असून पक्षी राजा जटायूच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरणही होणार आहेत. जटायूचा हा पुतळा ब्राँझ असून तो दिल्लीमध्ये तयार करण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात राम मंदिराच्या परिसरात जटायूच्या पुतळा स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -