घरक्रीडाInd vs Eng 3rd test : जखमी दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला...

Ind vs Eng 3rd test : जखमी दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संघात जागा

Subscribe

पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाल्यानंतर संघात बदल करणे अपेक्षीत होते. त्यातच दिनेश कार्तिक जखमी झाल्यामुळे नवोदीत खेळाडू ऋषभ पंतला कार्तिकच्या जागी स्थान देण्यात आले आहे.

सध्या इंग्लड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाचा इंग्लंडविरूद्ध आज तिसरा कसोटी सामना आहे. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यात लाजिरवाना पराभव स्विकारला होता. उभय संघांमध्ये गेल्या आठवड्यात जगप्रसिद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना झाला. या सामन्यात भारताने सपाटून मार खाल्ला आज भारत इंग्लंडविरोधात तिसरा कसोटी सामना खेळत आहे. तिसऱ्या कसोटीतही भारतासमोरच्या अडचणी काही केल्या कमी झालेल्या नाहीत. ट्रेंट ब्रिज येथे सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक जखमी झाला आहे. त्यामुळे दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संघात जागा देण्यात आली आहे.

याबाबत हर्षा भोगले यांनी सांगितले की, दिनेश कार्तिकला किती मोठी दुखापत झाली आहे माहित नाही. परंतु ऋषभ पंत सध्या सराव करतोय. त्यामुळे पंतला तिसऱ्या कसोटीसाठी संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच विराट कोहलीने सामना सुरु होण्याआधी ऋषभ पंतला भारतीय संघाची टोपी देत त्याच्या संघातली निवडीवर शिक्कामोर्तब केले. तर दुसऱ्या बाजूला पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या दिनेश कार्तिकने फलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन केले नव्हते. त्यामुळे कार्तिकऐवजी ऋषभ पंतला संघात जागा देण्याची मागणी होऊ लागली. त्यामुळे आजच्या सामन्यात ऋषभची निवड झाली

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -