घरक्रीडाIND vs NZ 1st Test : भारतीय संघ मजबूत स्थितीत; शेवटच्या दिवशी...

IND vs NZ 1st Test : भारतीय संघ मजबूत स्थितीत; शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी २८४ धावांचे आव्हान

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने दिलेल्या २८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने चौथ्या दिवसाअखेर १ बाद ४ धावा केल्या आहेत. सध्या भारत मजबूत स्थितीत आहे आणि शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी ९ बळींची गरज आहे तर न्यूझीलंडला २८० धावांची गरज आहे. यापूर्वी चौथ्या दिवसाच्या सुरूवातीला भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली आणि भारताने फक्त ५१ धावांवर आपले ५ बळी गमावले होते. मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋध्दिमान साहा यांच्यात महत्त्वाची भागीदारी झाली तर अश्विन आणि अक्षर पटेल यांनीही महत्त्वपूर्ण भागीदारी नोंदवून संघाला मजबूत स्थितीत पोहचवण्यात हातभार लावला.

दरम्यान भारताने ७ बाद २३४ वर आपला दुसरा डाव घोषित केला. श्रेयस अय्यर (६५), ऋध्दिमान साहा (६१*), रवीचंद्रन अश्विन (३२) आणि अक्षर पटेलने (२८*) धावांचे योगदान दिले. तर न्यूझीलंडकडून काइल जेमिसन आणि टिम साउदीने प्रत्येकी ३-३ बळी घेतले. भारताने दिवसाच्या शेवटीला सुरूवातीपासूनच दोन्ही बाजूंनी फिरकीचा मारा केला आणि त्याचा संघाला फायदा देखील मिळाला. अश्विनने त्याच्या दुसऱ्या षटकात विल यंगला बाद केले. यंग दोन धावा बनवून माघारी परतला.

- Advertisement -

भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २८४ धावांचे विशाल लक्ष्य दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना टॉम लाथम आणि विल यंगने न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात केली. पण अश्विनने यंगला बाद करून पहिला झटका दिला. तत्पुर्वी, भारतीय संघाने चौथ्या दिवशी जोरदार पुनरागमन करत तीन अर्धशतकीय भागीदारी करून ७ बाद २३४ पर्यंत मजल मारली आणि दुसरा डाव घोषित केला.

- Advertisement -

दरम्यान सोमवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी २८४ धावांची गरज आहे तर भारतीय संघाला विजयासाठी ९ गडी बाद करण्याची आवश्यकता आहे. दोन्हीही संघ शेवटच्या दिवशी चमकदार कामगिरी करून सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करतील.


हे ही वाचा:PSL : खेळाडूंना पाकिस्तानमध्ये खेळायचे नाही; PSL वरून रमीझ राजा यांचा संघमालकांशी वाद


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -