घरदेश-विदेशWinter Session 2021 : हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; महागाई, कोरोनासह अनेक मुद्द्यांवर...

Winter Session 2021 : हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; महागाई, कोरोनासह अनेक मुद्द्यांवर चर्चा

Subscribe

एमएसपी हमी देण्यासाठी कायदा करण्याची मागणी करण्यात आली.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी रविवारी सर्वपक्षीय बैठक झाली. नवीन कृषी कायदे मागे घेण्यासह अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीत किमान १५-२० विषयांवर चर्चा झाली. एमएसपी आणि इलेक्ट्रिक बिलावर तातडीने कारवाई करावी, असं सर्व पक्षांनी केंद्र सरकारला सांगितलं. तसेच एमएसपीवर कायदा करावा, अशी मागणी विरोधकांनी केली.

“महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कोरोनासह अनेक मुद्दे बैठकीत मांडण्यात आले. एमएसपीची हमी देणारा कायदा करण्यात यावा, अशी मागणी सर्व पक्षांनी केली. ज्यांनी आपला जीव गमावला आहे, त्यांच्या कुटुंबांना चार लाख रुपयांची भरपाई द्यावी. तसेच कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी,” अशी मागणी विरोधकांनी केली.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी बैठकीला गैरहजर

“आजच्या बैठकीला पंतप्रधान उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. पण काही कारणास्तव ते उपस्थित राहिले नाहीत. सरकारने कृषी कायदे मागे घेतले आहेत, पण ते शेतकऱ्यांना समजावून सांगू शकत नाही, असे मोदी म्हणाले होते. याचा अर्थ भविष्यात हे कायदे इतर कोणत्या स्वरूपात परत आणण्याची शक्यता आहे,” असं खरगे म्हणाले.

सर्वपक्षीय बैठकीत ३१ पक्ष सहभागी

बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ३१ पक्ष सहभागी झाले होते. विविध पक्षांचे ४२ नेते चर्चेचा भाग बनले. ज्या मुद्द्यावर सभापतींनी मंजुरी दिली आहे त्या प्रत्येक मुद्द्यावर सरकार चर्चा करण्यास तयार आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

तीन नवीन कृषी कायदे मागे घेणारं विधेयक

केंद्र सरकारकडून तीन नवीन कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक सभागृहात मांडले जाऊ शकते. केंद्रीय मंत्रिमंडळाने कायदे माघार घेण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. गेल्या एक वर्षापासून या कायद्यांबाबत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. एमएसपीच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे.

पेगासस हेरगिरीचा मुद्दाही सभागृहात उपस्थित होणार

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. अधिवेशनादरम्यान, विरोधक कृषी कायद्यांसह पेगासस स्पायवेअरवरून फोन टॅपिंगचा मुद्दा देखील उपस्थित करू शकतात. विरोधक सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर विरोधी चक्रव्यूह मोडून काढण्यासाठी सरकारकडून रणनीती आखली जात आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -