घरक्रीडाटेस्टमध्ये भारतच बेस्ट

टेस्टमध्ये भारतच बेस्ट

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. एकदिवसीय क्रमवारीत भारत दुसर्‍या स्थानी असून अव्वल स्थानी असलेल्या इंग्लंडपासून ते अवघ्या २ गुणांनी मागे आहेत. आयसीसीने गुरुवारी ताजी क्रमवारी जाहीर केली. ही क्रमवारी बनवताना २०१५-१६ या वर्षातील मालिकांचे निकाल वगळण्यात आले आहेत, तर २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांतील निकालांचे ५० टक्के गुणच गृहित धरण्यात आले आहेत.

कसोटी क्रमवारीत भारत पहिल्या स्थानी कायम आहे. न्यूझीलंड या क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असून आता या दोन्ही संघांत केवळ दोन गुणांचे अंतर उरले आहे. नवी क्रमवारी तयार करण्याआधी या दोन संघांमध्ये ८ गुणांचा फरक होता. भारताच्या खात्यात ११६ तर न्यूझीलंडच्या खात्यात १०८ गुण होते. मात्र, २०१५-१६ मधील दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्धचे मालिका विजय वगळण्यात आल्याने भारताला ३ गुण गमवावे लागले. तर याच मोसमात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली होती.

- Advertisement -

मात्र, ही मालिका वगळण्यात आल्याने न्यूझीलंडला तीन गुणांचा फायदा झाला आहे. त्यामुळे आता भारताचे ११३ गुण झाले असून न्यूझीलंडच्या खात्यात १११ गुण आहेत. २०१५-१६ या वर्षातील मालिकांचे निकाल वगळण्यात आल्याचा सर्वात मोठा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. त्यांची चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने तिसरे स्थान कायम राखले आहे.

एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंड अव्वल स्थानी असून भारत दुसर्‍या स्थानी आहे. या दोन संघांमध्ये २ गुणांचा फरक आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे, तर वेस्ट इंडिजचा संघ आठव्या स्थानी आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -