India Open 2022: आणखी 7 खेळाडूंना कोरोनाची लागण, स्पर्धेतून पडले बाहेर

11 जानेवारीपासून सुरू झालेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत कोरोनाची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दोन भारतीय खेळाडू बी. साई प्रणीत आणि ध्रुव रावत यांना कोरोना झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. तेव्हा इंग्लंड संघाने स्पर्धेतून आपले नावही काढून घेतले होते, त्यानंतर या स्पर्धेवरच टांगती तलवार दिसली.

badminton
badminton

नवी दिल्लीः इंडिया ओपन (India Open 2022) या वर्षातील पहिल्या बॅडमिंटन स्पर्धेवर कोरोना (Covid 19) ने कहर सुरूच ठेवलाय. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (Badminton World Federation) आणखी 7 खेळाडूंना कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिलीय. या सर्व खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतलीय. 12 जानेवारीला खेळाडूंची RT-PCR चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या सर्व खेळाडूंना स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळू शकले नाही, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना पुढील फेरीत वॉकओव्हर देण्यात आलाय. खेळाडूंची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन आणि बॅडमिंटन असोसिएशनच्या कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत चाचणी घेण्यात आली. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचे सामने गुरुवारी होणार आहेत.

11 जानेवारीपासून सुरू झालेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत कोरोनाची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दोन भारतीय खेळाडू बी. साई प्रणीत आणि ध्रुव रावत यांना कोरोना झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. तेव्हा इंग्लंड संघाने स्पर्धेतून आपले नावही काढून घेतले होते, त्यानंतर या स्पर्धेवरच टांगती तलवार दिसली.

ही स्पर्धा 16 जानेवारीपर्यंत चालणार

इंडिया ओपन स्पर्धा ही BWF वर्ल्ड टूर सुपर 500 चा भाग आहे. 11 ते 16 जानेवारीदरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत भारतासह जगातील अनेक स्टार शटलर्स सहभागी होत आहेत. भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, युवा स्टार लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी इंडिया ओपनच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. चेक प्रजासत्ताकच्या तेरेजा स्वाबिकोवा हिच्या निवृत्तीमुळे सायनाने दुसरी फेरी गाठली.

सायना पुढच्या सामन्यासाठी सज्ज

या स्पर्धेत चौथ्या मानांकित सायनासमोर आता देशबांधव मालविका बनसोडचे आव्हान असेल, ज्याने महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात देशबांधव सामिया इमाद फारुकीचा 21-18, 21-9 असा पराभव केला. दुखापतींमुळे सायना गेल्या वर्षी अनेक स्पर्धांमध्ये खेळू शकली नव्हती. अशा स्थितीत स्पर्धेची पुढील फेरी गाठल्यानंतर मालविका म्हणाला की, माझा आत्मविश्वास वाढला आहे. आज मी जे काही गुण मिळवले आहेत ते मला पुढील सामने जिंकण्यास मदत करतील.”


हेही वाचाः राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केल्यावर UP मधील जागा लढवण्याबाबत निर्णय, संजय राऊतांचे वक्तव्य