घरताज्या घडामोडीपाकिस्तानमधील 350 ते 400 आतंकवादी घुसखोरीच्या तयारीत, जनरल एमएम नरवणेंची माहिती

पाकिस्तानमधील 350 ते 400 आतंकवादी घुसखोरीच्या तयारीत, जनरल एमएम नरवणेंची माहिती

Subscribe

भारतावर दहशतवादी हल्ला केला तर त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. सीमेवर ड्रोनच्या मदतीने शस्त्रास्त्रे आणि रसद पुरवण्यासाठी करण्यात येत असल्याचे जनरल नरवणे यांनी सांगितले आहे.

पाकिस्तानमधील ३५० ते ४०० आतंकवादी घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये असल्याचा इशारा संरक्षण दल प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम, शस्त्रसंधीचे उल्लंघनाबाबत करार झाला आहे. परंतु पाकिस्तानमधील आतंकवादी सीमा सुरक्षा रेषेजवळ घुसखोरी करण्यासाठी तयारच आहेत. एवढ्या मोठ्या संख्येन आतंकवादी येत असल्याने पाकिस्तानचे नापाक मनसुबे उघड झाले आहेत.

लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सुरक्षेसंबंधी माहिती दिली आहे. नरवणे म्हणाले की, गेल्या वर्षी फेब्रुवारी 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत युद्धविराम, शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याबाबत जो समझोता करार झाला होता. त्याचा दोन्ही देशांना फायदा झाला आणि त्यामुळेच देशात शांतता होती. परंतु नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होतच होते असे जनरल नरवणे यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान जनरल नरवणे यांनी पुढे म्हटलं आहे की, एलओसीवर पाकिस्तानच्या बाजूने वेगवेगळ्या लॉन्च पॅडवर ४०० आतंकवादी आहेत. जे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे पाकिस्तानचे मनसुबे काय आहेत. याबाबतची माहिती समोर आली आहे. भारताचे दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स धोरण आहे.

भारतावर दहशतवादी हल्ला केला तर त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. सीमेवर ड्रोनच्या मदतीने शस्त्रास्त्रे आणि रसद पुरवण्यासाठी करण्यात येत असल्याचे जनरल नरवणे यांनी सांगितले आहे. पाकिस्तान जोपर्यंत एनजे-9842 प्वॉइंटच्या पलिकडे एजीपीएल म्हणजेच वास्तविक ग्राउंड पोझिशन लाईनवरील ताबा स्वीकारत नाही आणि त्यावर लिखीत सही करत नाही. तोपर्यतंत सियाचीन ग्लेशियर निशस्त्र करण्यात येणार नाही असे नरवणे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर जनरल मनोज नरवणे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. दहशतवादी संघटनांनी नवीन नाव देऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न फसला आहे. गैर काश्मीरी, मजूर, अल्पसंख्यांकांच्या हत्येचे मनसुबे वेळोवेळी सुरक्षा दलांनी हाणून पाडले असल्याचे नरवणे म्हणाले. ईशान्येकडील परिस्थितीही सुधारत आहे. सैन्याची तैनाती कमी करण्यात येत आहे. ईशान्येकडे असणाऱ्या राज्यांमधील दोन तुकड्या चीनच्या सीमेवर पाठवले आहे. म्यानमार सीमेवर लष्कराऐवजी आसाम रायफल्सची संख्या वाढवली असल्याचे नरवणे म्हणाले.


हेही वाचा : Covaxin Booster Dose : कोव्हॅक्सिनच्या बूस्टर डोसने डेल्टा, ओमिक्रॉन होतोय निष्क्रिय, भारत बायोटेकचा दावा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -