घरक्रीडाIND vs ENG 2nd Test : बुमराहने दूर केला रूटचा अडथळा; इंग्लंडचा...

IND vs ENG 2nd Test : बुमराहने दूर केला रूटचा अडथळा; इंग्लंडचा निम्मा संघ माघारी

Subscribe

भारताने चौथ्या डावात इंग्लंडपुढे २७२ धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगतदार वळणावर आहे. लॉर्ड्सवर होत असलेल्या या कसोटीत भारताने चौथ्या डावात इंग्लंडपुढे २७२ धावांचे आव्हान ठेवले आहे. याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अडचणीत आहे. २५ षटकांनंतर इंग्लंडची ५ बाद ७३ अशी अवस्था झाली. पहिल्या डावात नाबाद १८० धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार जो रूटला दुसऱ्या डावात मोठी खेळी करता आली नाही. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रूटचा अडथळा दूर केला. रूटने ६० चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ३३ धावांची खेळी केली. इंग्लंडच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. रोरी बर्न्स आणि डॉम सिबले हे इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर खातेही न उघडता माघारी परतले. तर ईशांत शर्माने हसीब हमीद (९) आणि जॉनी बेअरस्टो (२) यांना पायचीत पकडले.

शमी, बुमराहची उत्कृष्ट फलंदाजी 

त्याआधी पाचव्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात ६ बाद १८१ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. रिषभ पंतला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्याला २२ धावांवर ऑली रॉबिन्सनने बाद केले. रॉबिन्सननेच ईशांत शर्मालाही (१६) पायचीत पकडले. यानंतर मात्र मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. शमीने ७० चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५६ धावांची खेळी केली. त्याला बुमराहने ६४ चेंडूत नाबाद ३४ धावांची खेळी करत अप्रतिम साथ दिली. या दोघांनी ८९ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे भारताने दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित करत इंग्लंडपुढे विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवले.

- Advertisement -

हेही वाचा – विराट कोहलीच्या फलंदाजीवर गावस्करांची टीका, म्हणाले…


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -