घरक्रीडाआशिया चषकात भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता

आशिया चषकात भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता

Subscribe

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवार 28 ऑगस्ट रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानावर विजय मिळवला आहे. भारताने ५ विकेटनी पाकिस्तानचा पराभव केला होता.

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवार 28 ऑगस्ट रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानावर विजय मिळवला आहे. भारताने ५ विकेटनी पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्ताना आमने-सामने येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (india vs pakistan match in asia cup 2022)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये नेहमीच उत्साहाचे वातावरण असते. तसेच, या दोन संघांमधील सामन्याकडे क्रिकेटयुद्ध म्हणूनही पाहिले जाते. भारत आणि पाकिस्तानच्या पहिल्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पाड्याने विजयी षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

आशिया चषकातील साखळी सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा समोर येण्याची शक्यता अधिक आहे. त्याचे कारण म्हणजे ग्रुप फेरीनंतर सुपर 4 फेरीत दोन्ही ग्रुपमधील प्रत्येकी 2 संघांच्या लढती होणार आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 सप्टेंबर रोजी लढत होण्याची शक्याता आहे. ही लढत ग्रुप ए 1 आणि ग्रुप ए 2 या संघात होणार आहे.

आशिया चषकात 6 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, हाँगकाँग आहे, तर ग्रुप बी मध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ आहेत. ग्रुप ए मध्ये भारत सध्या अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तान दुसऱ्या तर हाँगकाँग अखेरच्या स्थानावर आहे.

- Advertisement -

भारत आणि पाकिस्तानची ग्रुप फेरीतील लढत हाँगकाँगविरुद्ध असेल. दोन्ही संघांनी हाँगकाँगविरुद्धची लढत जिंकली आणि ग्रुपमध्ये काही उटलफेर झाला नाही तर चित्र स्पष्ट आहे. ग्रुपमध्ये भारत अव्वल तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे.

या लढतीशिवाय भारताला सुपर लीग मध्ये आणखी दोन सामने खेळायचे आहेत. या लढती बांगलादेश, श्रीलंका किंवा अफगाणिस्तान या संघांशी होऊ शकता. भारताने या सर्व लढती जिंकल्या तर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचेल. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला देखील या संघांविरुद्ध लढावे लागणार आहे. त्यांनी देखील विजय मिळवल्यास ते अंतिम फेरीत दाखल होतील.


हेही वाचा – …तर तो वाचला नसता, वीरेंद्र सेहवागच्या कमेंटवर पाकिस्तानचा माजी खेळाडू भडकला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -