घरक्रीडाIND vs SA : आफ्रिका दौऱ्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचे वाढले टेंशन; ४...

IND vs SA : आफ्रिका दौऱ्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचे वाढले टेंशन; ४ खेळाडू दुखापतग्रस्त, होऊ शकतात बाहेर

Subscribe

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची कोणत्याही क्षणी घोषणा केली जाऊ शकते

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची कोणत्याही क्षणी घोषणा केली जाऊ शकते. मात्र भारतीय संघाच्या घोषणेच्या पूर्वसंध्येलाच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान माहितीनुसार भारतीय संघातील ४ खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे ते खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न जाण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र जडेजा, शुभमन गिल, ईशांत शर्मा आणि अक्षर पटेल दुखापतीच्या कारणास्तव आफ्रिका दौऱ्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाच्या आफ्रिका दौऱ्यातील संघाची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे.

अष्टपैलू रवींद्र जडेजाला कानपूरच्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्या कारणामुळे तो मुंबईतील सामन्यात देखील खेळला नव्हता. तर शुभमन गिलला देखील फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो मागील सामन्यात सलामीला फलंदाजी करायला आला नव्हता. ईशांत शर्मा देखील दुखापतीमुळे कसोटी सामन्यात खेळला नव्हता.

- Advertisement -

अशातच भारतीय संघातील हे चार खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत नसले तर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कारण दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची मालिका होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या यादीत एकूण २० खेळाडूंचा समावेश करायचा आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत एखाद्या खेळाडूच्या जागेवर दुसऱ्या खेळाडूला खेळता येईल.

कसोटी सामन्याच्या संघाची घोषणा यासाठी देखील लक्षणीय आहे कारण कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेच्या भविष्याचा देखील निर्णय होऊ शकतो. रहाणे सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. रहाणे सध्या भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: http://Umpire Deepak Naiknavare : महाराष्ट्रातील अंपायरचा भन्नाट अंदाज; इंग्लंडचा माजी क्रिकेपटूपण हैराण


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -