घरताज्या घडामोडीफक्त संजय राऊतांनाच लक्ष्य का?, विरोधी पक्षनेते अजित पवारांचा सवाल

फक्त संजय राऊतांनाच लक्ष्य का?, विरोधी पक्षनेते अजित पवारांचा सवाल

Subscribe

गेल्या काही वर्षांमध्ये केंद्रीय यंत्रणाचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. एक चौकशीची प्रक्रिया असली तरी आतापर्यंत अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या असताना केवळ संजय राऊत यांनाच का लक्ष्य केले जात आहे, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी केला. तपास हा यंत्रणेचा भाग असला तरी यामध्ये राजकारण न आणता आणि सूडबुद्धीने कारवाई करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर मत व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, संजय राऊत हे त्यांच्या मतावर आणि पक्ष निष्ठेवर ठाम आहेत म्हणून जर कारवाई होत असेल तर चुकीचे आहे. त्यामुळे नोटीस केवळ त्यांनाच असा भाग नाहीतर ज्यांना-ज्यांना नोटीस बजावण्यात आली त्यांचीही चौकशी होतेय का हे पाहणे महत्वाचे असल्याचे पवार म्हणाले.

- Advertisement -

राऊतांवर झालेल्या कारवाईनंतर समाज माध्यमांमध्ये वेगळेच चित्र आहे. केंद्रीय संस्थांच्या भूमिकेबद्दलही प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे आलेले दिवस जाणारच आहे. याचा किती गैरवापर करायचा हे ज्याने त्याने ठरवावे. शिवाय दिवस काय हेच कायम राहणार नाहीत. त्यामुळे भविष्यात वेगळे चित्र असेल, असे सांगताना या कारवाईमागे कोण आहे नव्याने सांगण्याची आवश्यकता नसल्याचे अजित पवार म्हणाले.

आतापर्यंत अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या कुणाची चौकशी झाली तर कुणावर कारवाई. मात्र, हे होत असताना यंत्रणा ही केंद्राची असो की राज्याची त्यांनी सूडबुध्दीने चौकशी करु नये. कारण हे देशाच्या दृष्टीने धोक्याचे आहे. चौकशीमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईल पण सूडबुध्दीने केलेली कारवाई आता समाज माध्यमापासूनही लपून राहत नाही, असा इशारही अजित पवार यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा : बदलता काळ तुमच्याशी जास्त निर्घृणपणे वागू शकतो, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -