घरक्रीडाभारतीय बॉक्सर अमित पंघालचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; वनुआटूच्या नामारी बेरी पराभूत

भारतीय बॉक्सर अमित पंघालचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; वनुआटूच्या नामारी बेरी पराभूत

Subscribe

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) च्या सुरूवातीपासून भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. अशातच आता भारताचा स्टार बॉक्सर (Boxer) अमित पंघाल (Amit Panghal) याने बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) च्या सुरूवातीपासून भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. अशातच आता भारताचा स्टार बॉक्सर (Boxer) अमित पंघाल (Amit Panghal) याने बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अमित पंघालने पहिल्याच सामन्यात वनुआटूच्या नामारी बेरीचा (Namari Berry) पराभव केला. (commonwealth games 2022 boxing amit panghal enters quarterfinals 5 0 win 48 51kg)

राष्ट्रकुल स्पर्धेतील बॉक्सिंगच्या सामन्यात अमित पंघालने सुरूवातीपासूनच जबरदस्त कामगिरी केली. प्रतिस्पर्धी नामरी बेरीवर अमित पंघालने पहिल्या दोन फेरीत दमदार कामगिरी केली. तसेच, तिन्ही फेऱ्यांमध्ये १०-१० गुण मिळवले असून, बेरीने पहिल्या फेरीत ९ गुण मिळवले होते. पण पुढच्या २ फेरीत मात्र, त्याला ८ गुणांच्या पुढे जाता आले नाही.

- Advertisement -

आतापर्यंत भारताच्या क्रिकेट, हॉकी संघाने आपपले सामने जिंकले. तसेच, भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजने (Srihari Nataraj) ५० मीटर बॅकस्ट्रोकच्या फायनमध्ये जागा निश्चित केली आहे. त्याच्याकडे  ५० मीटर बॅकस्ट्रोकच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

भारत सहाव्या स्थानावर

- Advertisement -

राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदक तालिकेमध्ये भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या पुढे आता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिन आफ्रिका आणि कॅनडा हे देश आहेत. आतापर्यंत भारताकडून अंचिता शेउली आणि जेरेमी लालरिनुंगा यांच्या आधी मीराबाई चानूने सुवर्णपदक, संकेत सरगरने रौप्य तर बिंदियाराणी देवीने रौप्य आणि गुरुराज पुजारी ने कांस्य पदक पटकावले होते.

राष्ट्रकुल स्पर्धेचा आज चौथा दिवस

वेटलिफ्टर मीराबाई चानूला राष्ट्रकूल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले आहे. ४९ वयोगटाच्या श्रेणीत तिला गोल्ड मिळेल अशी आशा होती. तिने ती सार्थ करुन दाखवली आहे. बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे. काल म्हणजेच तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले.


हेही वाचा – बर्मिंगहम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सहावे पदक, वेटलिफ्टींगमध्ये अचिंता शेउलीनेला सुवर्ण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -