घरक्रीडाAsian Champions trophy : भारतीय महिला हॉकी खेळाडू कोरोना संक्रमित; कोरियाविरूध्दचा महत्त्वाचा...

Asian Champions trophy : भारतीय महिला हॉकी खेळाडू कोरोना संक्रमित; कोरियाविरूध्दचा महत्त्वाचा सामना रद्द

Subscribe

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या भारतीय महिला हॉकी संघातील एक खेळाडू कोरोनाने संक्रमित झाली आहे

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या भारतीय महिला हॉकी संघातील एक खेळाडू कोरोनाने संक्रमित झाली आहे. त्यामुळे गतविजेत्या कोरियाविरूध्दचा बुधवारी होणारा सामना रद्द करण्यात आला. याबाबतची अधिकृत माहीती आशियाई हॉकी महासंघातर्फे देण्यात आली आहे. तर अटलांटिक हॉकी फेडरेशनतर्फे (AHF) देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. एएचएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, “आशियाई महासंघाला हे सांगताना खेद वाटतो की भारतीय संघाची एक खेळाडू नियमित कोरोनाच्या चाचणीदरम्यान संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारत आणि कोरिया मधील बुधवारी होणारा सामना रद्द केला जात आहे”.

दरम्यान हि माहिती समोर आल्यानंतर देखील हे अद्याप निश्चित नाही की भारत आणि चीनमध्ये होणारा सामना होणार की नाही. लक्षणीय बाब म्हणजे कोरोना महासाथीने मंगळवारीच स्पर्धेला गालबोट लावले होते. जेव्हा मलेशियाविरूध्दचा दुसरा सामना कोविडला जोडलेल्या मुद्द्यांच्या कारणास्तव रद्द करावा लागला होता. मलेशियाचा एक खेळाडू नुरुल फैजाह शफीकाह खलीम, दक्षिण कोरियामध्ये आल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि चाचणी केल्यानंतर त्याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. माहितीनुसार, मलेशियाप्रमाणे भारतीय संघालाही एखाद्या खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर बायो-बबलमध्ये राहावे लागू शकते.

- Advertisement -

मागील वर्षातील उपविजेत्या भारतीय संघाने थायलंडविरूध्दच्या सामन्यात १३-० ने विजय मिळवला होता. त्यामध्ये गुरजीत कौरने पाच गोल केले होते. सध्या भारत आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या महिला संघाच्या क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे आणि या स्पर्धेत भाग घेणारा सर्वोच्च क्रमावारीचा संघ आहे.

- Advertisement -

हे ही वाचा:  http://IND vs SA : आफ्रिका दौऱ्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचे वाढले टेंशन; ४ खेळाडू दुखापतग्रस्त, होऊ शकतात बाहेर


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -