घरनवी मुंबईएपीएमसीत आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर घसरले

एपीएमसीत आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर घसरले

Subscribe

अवकाळी पाऊस थांबला असला तरी त्यामुळे शेतात पडून राहिलेला माल शेतकर्‍यांनी तोडणी करून पाठवल्याने वाशीतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल येऊन पडला.

अवकाळी पाऊस थांबला असला तरी त्यामुळे शेतात पडून राहिलेला माल शेतकर्‍यांनी तोडणी करून पाठवल्याने वाशीतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल येऊन पडला. नियमित सरासरी ६०० गाडी आवक भाजीपाला बाजारात येते. मात्र सोमवारी अंदाजे ८०० गाडी आवक भाजीपाला बाजारात झाली. परिणामी भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळी ४० रुपये प्रतिकिलो विकला गेलेला वाटाणा दुपारपर्यंत २४ रुपये प्रतिकिलो दराने विकावा लागल्याचे व्यापारी सांगत आहेत. शिवाय इतर भाजीपाला १० ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

भाजीपाला बाजारातील जवळपास ५० टक्के शेतमाल पडून असल्याने भाजीपाला खराब होण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली. अवकाळी पावसाचा परिणाम आणखी काही दिवस राहण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. तर आणखी काही दिवस भाजीपाला दर स्थिर राहतील, असे सांगण्यात येत आहे. पावसाने शेतमाल खराब होऊन शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असून दर कमी मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सध्या वाटण्याचा हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात वाटाणा बाजारात येत आहे. मात्र, वाटण्याला चांगला दर मिळत नसल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे इतर भाज्यांचे दर देखील कमी झाले आहेत. किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने त्या ठिकाणी भरमसाठ अधिक दराने भाजीपाल्याची विक्री होत आहे.

- Advertisement -

बाजारातील भाज्यांचे दर –

वाटाणा २४ ते ४०, फ्लॉवर १०, भेंडी २०, गाजर १०, शिमला २०, फ्लॉवर १२, टोमॅटो ३०, मिरची २०, कोबी १२, दुधी १०, वांगी १०, कारली १० रुपये प्रतिकिलो तर कोथिंबीर ५ आणि मेथी ५ रुपये जुडी

हेही वाचा –

Bipin Rawat Helicopter Crash Live Update: राजनाथ सिंह बिपीन रावत यांच्या घरातून निघाले 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -