घरटेक-वेकअरे व्वा! आता चालता फिरता Air Charge होणार मोबाईल फोन

अरे व्वा! आता चालता फिरता Air Charge होणार मोबाईल फोन

Subscribe

शाओमीने आपला नवीन वायरलेस चार्जर MiAir Charge (एमआय एयर चार्ज) लाँच केला आहे. शाओमीचा हा चार्जर जगातील पहिला वायरलेस चार्जर आहे. ही नवी टेक्नोलॉजी सध्याच्या वायरलेस चार्जिंग पद्धतीहून वेगळी आहे. Mi Air Charge टेक्नोलॉजीद्वारे युजर्स दूरवरूच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसला चार्ज करू शकतील. या टेक्नोलॉजीने विना वायर, गेम खेळताना, चालतानाही एकावेळी अनेक डिव्हाईस चार्ज केले जाऊ शकतील.

Mi Air Charge ने आपण केबलशिवाय आणि वायरलेस चार्जिंग स्टँडशिवाय कोणताही डिव्हाइ चार्ज करू शकता. Xiaomi Mi Air Charge ने टॅब्लेट, फोन आणि इतर वायरलेस चार्जिंग डिव्हाइस चार सेंटीमीटरच्या अंतरावरुन चार्ज करू शकता. शाओमीने हा चार्जर कधी बाजारात येईल याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

- Advertisement -

- Advertisement -

हा कदाचित कॉन्सेप्ट चार्जर असू शकतो. या शाओमी चार्जरद्वारे एकाच वेळी 5 वॅट्सच्या क्षमतेसह अनेक डिव्हाइस चार्ज करु शकतो. भविष्यात हा चार्जर कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी आणि अतिथी कक्षात वापरले जाऊ शकतात. शाओमीने स्वतः हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या चार्जरची रचना बॉक्स सारखी आहे ज्यात डिस्प्लेदेखील आहे. या डिस्प्लेमध्ये किती चार्जिंग झाली आहे हे दिसेल.

Mi Air Charge वायरलेस चार्जर कसं काम करतं?

आता हा चार्जर कसं चार्ज करणार हा एक मोठा प्रश्न आहे. कारण बाजारातील सर्व वायरलेस चार्जर आता मॅग्नेटद्वारे फोन चार्ज करतात, परंतु हा चार्जर तसा नाही आहे. Mi Air Charge मध्ये वायरलेस चार्जिंगसाठी 144 अँटेना आहेत जी मिलिमीटर वाइड वेब ट्रान्समीट करतं. या वेबद्वारे फोन बीमफॉर्मिंगने चार्ज होतो. फोनचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी या चार्जरमध्ये स्वतंत्रपणे पाच अँटेना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – स्टायलिश, दमदार फिचर्सवाली Renault Kiger लाँच; किंमत सर्वसामान्यांना परवडणारी


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -