घरक्रीडाभारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास; आशियाई अन् राष्ट्रकुल स्पर्धेत अशी केली...

भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास; आशियाई अन् राष्ट्रकुल स्पर्धेत अशी केली कामगिरी

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) प्रवेश करत सुवर्णपदक कामगिरी केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे. विशेष म्हणजे याआधी महिला संघाने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. अशाप्रकारे भारतीय महिला क्रिकेट संघ आशियाई क्रीडा स्पर्धा आमि राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणार पहिला संघ ठरला आहे. (Indian womens cricket team made history He did this in the Asian and Commonwealth Games)

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा 15 चेंडूत अवघ्या 9 धावा करून बाद झाली. यानंतर स्मृती मानधना आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्ज या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची मजबूत भागीदारी करत संघाची धावसंख्या 89 धावांपर्यंत नेली. स्मृती मंधाना 45 चेंडूत 4 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 46 धावा करून बाद झाली. मात्र अखेरच्या 5 षटकांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला काही खास कामगिरी करत आली नाही.

- Advertisement -

शेवटच्या 30 चेंडूत संघाने केवळ 27 धावा करत आपल्या 5 विकेट गमावल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने 40 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. भारतीय महिला क्रिकेट संघाने निर्धारीत 20 षटकात 7 विकेट गमावत फक्त 116 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघाला 8 विकेट गमावत 97 धावाच करता आल्या. त्यामुळे श्रीलंका महिला क्रिकेट संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले तर, बांगलादेश महिला संघाने पाकिस्तानला हरवत कांस्यपदक जिंकले आहे.

- Advertisement -

तीतास साधूची चमकदार कामगिरी

भारतीय महिला क्रिकेट संघाची 18 वर्षीय वेगवान गोलंदाज तीतास साधूने संघाला चांगली सुरुवात करून दिली. तिने पहिल्या षटकात 2 आणि दुसऱ्या षटकात एक विकेट घेतली. तिने पहिल्या 8 चेंडूत 3 विकेट घेत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले होते. तीतासने 4 षटकांच्या कोट्यात केवळ 6 धावा देत 3 विकेट घेतल्या.

श्रीलंकेची फलंदाजी

श्रीलंकन ​​संघाची कर्णधार आणि आक्रमक फलंदाज चमारी अटापट्टू हिने 12 चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 12 धावा करून बाद झाली. त्यानंतर हसिनी परेराने 22 चेंडूत 25 धावा केल्यामुळे श्रीलंका संघाची धावसंख्या 50 धावांवर पोहचली. मात्र धोकादायक दिसत असलेल्या हसिनी परेराला डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने बाद करत भारतीय संघाला दिलासा दिला. श्रीलंके संघाला शेवटच्या 5 षटकात विजयासाठी 43 धावांची गरज असताना त्याच्या 6 विकेट्स शिल्लक होत्या. मात्र 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पूजा वस्त्राकरने निलाक्षी डिसिल्वारला क्लिन बोल्ड केले. निलाक्षी डिसिल्वा 34 चेंडूत 23 धावा करून बाद झाली. ओशेडी रणसिंगने एका बाजूने संघर्ष सुरूच ठेवला, मात्र 18 वे षटक टाकणाऱ्या दीप्ती शर्माने ओशेडीला बाद केले. ओशेडी 26 चेंडूंत 19 धावा करून बाद झाली. श्रीलंका संघाला शेवटच्या षटकात 25 धावांची गरज असताना राजेश्वरी गायकवाडने केवळ 5 धावा दिल्या, त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने 19 धावांनी सुवर्णपदक जिंकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -