घरमुंबईMLA Disqualification : शिंदेंसह 16 आमदार अपात्रतेचे वेळापत्रक ठरणार? ठाकरे गटाला किती...

MLA Disqualification : शिंदेंसह 16 आमदार अपात्रतेचे वेळापत्रक ठरणार? ठाकरे गटाला किती फियदा!

Subscribe

मुंबई – एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्रतेवर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दुसरी सुनावणी आज (सोमवार, 25 सप्टेंबर) होत आहे.
पहिली सुनावणी 14 सप्टेंबरला झाली होती. तेव्हा शिंदे गटाने तक्रार केली होती की, ठाकरे गटाने जे उत्तर दिले आहे. त्याची कागदपत्रं त्यांना मिळालेली नाही. ती कागदपत्र मिळावी, म्हणजे आम्हाला त्यांना उत्तर देता येईल. हे उत्तर देण्यासाठी, त्याची तयारी करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला वेळ द्यावा. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे गटाला दोन आठवड्यांचा अवधी दिला होता. त्यानुसार आजची सुनावणी होत आहे.
विधानसभा अध्यक्षांकडे होणाऱ्या या अपात्रतेच्या सुनावणीआधी जाणून घेऊया आज विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेऊ शकतात.
11 मे रोजी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या आपत्रतेचा निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. तेव्हा त्यांनी व्हिप कोणाचा, गटनेता कोणाचा यासंबंधी निर्णय दिला होता.
१) सुप्रीम कोर्टाने शिंदेचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप बेकायदेशीर ठरवला होता.
२) राज्यपालांच्या कृतीवर ताशेरे ओढले होते.
३) सरकार स्थापनेसंदर्भात जी पावलं शिंदे-फडणवीसांकडून उचलली गेली होती त्यावरही सुप्रिम कोर्टाने आपलं निरीक्षण नोंदवलं होतं.
४) विश्वासदर्शक ठराव घेण्याचीही गरज नव्हती असंही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं.
५) विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरही सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला होता.
६) राज्यपालांच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने ही सर्व निरीक्षणं नोंदवली होती.
व्हीप म्हणून गोगावलेंची नेमणूक, गटनेतेपदी एकनाथ शिंदेची नेमणूक यावर सविस्तर चर्चा तेव्हा सुप्रीम कोर्टात झाली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टान या दोघांचाही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला होता, आणि शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते.
आणि दुसरे प्रकरण शिवसेना कोणाची याचा निर्णय घेण्याचे अधिकारही अध्यक्षांनाच दिले होते.
शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने 23 फेब्रुवारी 2023 रोजी दिला होता.
त्यानुसार पक्षाचे नाव शिवसेना, आणि चिन्ह धनुष्यबाण, शिंदे गटाला देण्याचा निर्णय झालेला होता.
केंद्रीय निवडणूक आयोगाने तेव्हा निकाल देताना म्हटले होते की, विधीमंडळातील आणि संसदेतील आमदार – खासदारांची संख्या लक्षात घेऊन हा निर्णय देण्यात आला आहे.

आज होणाऱ्या सुनावणीआधी अशी माहिती समोर आली होती, की विधानसभा अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नोटीस पाठवणार आहेत. पक्षप्रमुख म्हणून या दोघांना ही नोटीस पाठवली जाणार आहे. आवश्यकता भासली तर विधानसभाध्यक्ष ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीसाठी बोलावणार आहेत. मात्र विधानसभाध्यक्षांनी सांगितल्यानुसार आतापर्यंत अशी नोटीस ठाकरे आणि शिंदे यांना नोटीस गेलेली नाही.
आजच्या सुनावणीला ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांना त्यांच्या वकीलांसह उपस्थित राहाता येणार आहे.
चार ते पाच आमदारांचा एक वकील असणार आहे. शिंदे गटाच्या काही आमदारांनी त्यांचे स्वतंत्र वकीलही नेमले आहेत.
पहिली सुनावणी झाली असली तरी त्यामध्ये काहीही घडलं नव्हतं असचं दिसत आहे, त्यामुळेच ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले होते.

- Advertisement -

हेही वाचा : विरोधात बातम्या येऊ नयेत म्हणून काय करायचं? बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिला ‘हा’ अजब सल्ला

आतापर्यंत या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना नोटीस पाठवण्याव्यतिरिक्त काहीही केले नाही, असा ठाकरे गटाचा आरोप आहे. त्यावरुन सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना सुनावले होते. सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा राखण्याचे सांगितले होते.
आठवड्याभरात त्यांनी अपात्रते संबंधीचा त्यांचा कार्यक्रम – टाईमटेबल कळवावा असेही आदेश दिले होते.
त्यानुसार आता विधानसभा अध्यक्षांना, ठाकरे आणि शिंदे गटाला अपात्रतेच्या पुढील सुनावणीचा संपूर्ण टाईमटेबल द्यावा लागणार आहे.
हा टाईमटेबल- सुनावणीचे वेळापत्रक देत असताना विधानसभा अध्यक्षांकडून काही खबरदारी देखील घेतली जाऊ शकते. त्यामुध्ये आजपासून पुढील सण-उत्सव-समारंभ यांची दखल घेऊन सुनावणीचे वेळापत्रक द्यावे लागणार आहे.
यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे. हे सर्व कार्यक्रम लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष टाईमटेबल – वेळापत्रक देण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी लक्षात घेऊन सुनावणीचे वेळापत्रक ठरवण्यात आले तर, डिसेंबरपर्यंत ही सुनावणी होऊ शकते किंवा पुढच्या वर्षापर्यंतही चालू राहू शकते. असं म्हणण्याचं कारण म्हणजे, राहुल नार्वेकर यांनीच याआधी म्हटलं होतं की निकाल देण्यासाठी वेळही लागू शकतो. कारण सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल देण्यासाठी एक वर्षाचा कालावधी घेतला होता. अपात्रतेचा निकाल वेळेत दिला जाईल, मात्र ते करत असताना कोणावर अन्याय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. प्रत्येक आमदाराशी बोलण्याची आवश्यकता वाटली तर तेही केलं जाईल. जर आवश्यकता वाटली तर, पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचीही बाजू समजून घेतली जाईल.
आजच्या सुनावणीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सुनावणीचा शेड्यूल – टाईम टेबलआज दिला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ठाकरे गटासाठी वेळापत्रक का महत्त्वाचं

तर ठाकरे गटाने आरोप केलेला आहे की, विधानसभा अध्यक्षांकडून चालढकलपणा केला जात आहे. वेळकाढूपणा केला जात आहे. याचसाठी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती की अध्यक्षांनी वेळेत सुनावणी पूर्णकरुन निर्णय घेण्याचे आदेश द्यावे. याच याचिकेवर 18 सप्टेंबरला सुनावणी झाली तेव्हा, सर्वोच्च न्यायालायाचे न्यायाधाशी धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीचे टाईमटेबल देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. आणि ही कारवाई वाजवी वेळेत पूर्ण करावी. वाजवी वेळेत म्हणजे अनंतकाळ असेही नाही, असेही सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना सुनावले होते.
त्यामुळेच आजची सुनावणी ही ठाकरे गटासाठी महत्त्वाची आहे. आजच्या सुनावणीत अपात्रतेचा निर्णय किती दिवसांत दिला जाईल, त्यासाठीचा कार्यक्रम काय असेल, हे अध्यक्ष सांगण्याची शक्यता आहे. याचा फायदा ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी होऊ शकतो. कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन चार महिने झाले तरी अध्यक्षांकडून नोटीसी पाठवण्याशिवाय कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा ठाकरे गटाचा आक्षेप आहे.
तर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय करतात, काय निर्णय देतात, कोणता टाईमटेबल, अपात्रतेचं शेड्यूल जाहीर करतात का? यावर महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -