Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : KKR मध्ये कोरोनाची एंट्री अन् शाहरुख खान अ‍ॅक्शन मोडमध्ये;...

IPL 2021 : KKR मध्ये कोरोनाची एंट्री अन् शाहरुख खान अ‍ॅक्शन मोडमध्ये; खेळाडूंचे वाढवले मनोबल

कोलकाताच्या ताफ्यात थोडे चिंतेचे वातावरण होते. या परिस्थितीत संघमालक शाहरुख खानने पुढे येत आपल्या संघाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (BCCI) सोमवारचा दिवस विसरण्याजोगा ठरला. कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) वरूण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. तसेच चेन्नई सुपर किंग्सच्या तीन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मात्र, असे असले तरी आयपीएल स्पर्धा बायो-बबलमध्ये सुरु असून तिथे कोरोना शिरकाव करणार नाही, असा बीसीसीआयला विश्वास होता. परंतु, बीसीसीआय आणि सर्व संघांनी आवश्यक काळजी घेतल्यानंतरही कोलकाताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे कोलकाताच्या ताफ्यात थोडे चिंतेचे वातावरण होते. या परिस्थितीत संघमालक शाहरुख खानने पुढे येत आपल्या संघाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

शाहरुखने साधला संवाद

भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याने बऱ्याच देशांनी आपली हवाई वाहतूक स्थगित केली आहे. त्यामुळे खासकरून परदेशी खेळाडू चिंतेत आहेत. त्यातच आता बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने खेळाडू अधिक तणावात आहेत. कोलकाताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली असून पॅट कमिन्ससारखे काही खेळाडू आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शाहरुख व कोलकाता संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर यांनी त्यांच्याशी संवाद साधल्याचे समजते.

- Advertisement -

खेळाडूंनी मानले आभार

अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि यष्टीरक्षक-फलंदाज शेल्डन जॅक्सन या कोलकाताच्या खेळाडूंनी ट्विटरवरून शाहरुखचे आभारही मानले. कठीण काळात आमच्यासोबत असल्याबद्दल मी शाहरुख, कोलकाता नाईट रायडर्स व्यवस्थापन आणि वेंकी मैसूर यांचे आभार मानतो, असे हरभजन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

- Advertisement -

- Advertisement -