घरक्रीडाIPL 2022 : मेगा ऑक्शनपूर्वी लखनऊ-अहमदाबादच्या संघांना ३-३ खेळाडू विकत घेण्याची संधी;...

IPL 2022 : मेगा ऑक्शनपूर्वी लखनऊ-अहमदाबादच्या संघांना ३-३ खेळाडू विकत घेण्याची संधी; या खेळाडूंची नावे आघाडीवर

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग २०२२ साठी लवकरच मेगा ऑक्शन होणार आहे

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ साठी लवकरच मेगा ऑक्शन होणार आहे. दरम्यान आगामी आयपीएलसाठी लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघाचा समावेश झाला आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या या मेगा ऑक्शनच्या आधी या दोन्ही नवीन संघाना ३-३ खेळाडू विकत घेण्याची संधी असणार आहे. कारण सर्व जुन्या संघांना ३-३ खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी होती. मात्र नवीन संघांना हा पर्याय नव्हता. त्यामुळे यांना ३-३ खेळाडू खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. अशातच दोन नवीन संघ कोणकोणत्या खेळाडूंना खरेदी करणार याकडे सर्व क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संजीव गोएंका यांनी लखनऊची फ्रँचायझी ७ हजार कोटीमध्ये खरेदी केली आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरची लखनऊ संघाच्या मेंटॉर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर झिम्बाब्वेच्या संघाचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले आहे. दरम्यान आता संघाला ३१ डिसेंबरच्या अगोदर ३ खेळाडूंना खरेदी करण्याची संधी दिली आहे. माहितीनुसार, लखनऊची फ्रँचायझी के.एल राहुल, राशिद खान आणि ईशान किशनला खरेदी करू शकते.

- Advertisement -

केएल राहुलचे लखनऊ फ्रँचायझीसोबत सामील होणे जवळपास निश्चित झाले आहे. लखनऊने के.एल राहुलसमोर २० कोटींची ऑफर ठेवल्याचेही समोर आले आहे. तर के.एल राहुल कर्णधार म्हणून संघात सामील होऊ शकतो. सनरायझर्स हैदराबादचा राशिद खान लखनऊच्या संघातील दुसरी पसंती ठरू शकतो. हैदराबादने त्याला रिटेन केले नाही. राशिद हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. तर ईशान किशनने गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स कडून खेळताना शानदार खेळी केली होती. तरीही त्याला मुंबईच्या संघाने रिलीज केले. त्यामुळे तो देखील लखनऊच्या संघात सामाविष्ट होण्याची शक्यता आहे.

तर, सीवीसी कॅपिटल्सने आयपीएल मधील अहमदाबाद फ्रँचायझीला ५ हजार कोटीहून जास्त किमतीला खरेदी केले. माहितीनुसार, अहमदाबादची फ्रँचायझी श्रेयस अय्यर, डेविड वॉर्नर आणि हार्दिक पांड्या या तीन खेळाडूंना खरेदी करण्याचा विचार करत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : http://Pro Kabaddi League : ४६ वर्षीय धर्मराज ८ व्या हंगामातही खेळणार; जाणून घ्या कोण आहेत या हंगामातील सर्वात वयस्कर खेळाडू


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -