घरक्रीडाIPL 2022 : धोनीच्या संघात परतण्यासाठी अश्विन इच्छुक; म्हणाला, CSK माझ्या हृदयाची...

IPL 2022 : धोनीच्या संघात परतण्यासाठी अश्विन इच्छुक; म्हणाला, CSK माझ्या हृदयाची…

Subscribe

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रिलीज केले आहे

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ साठी लवकरच मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएलमधील सर्व जुन्या ८ संघानी त्यांच्या संघातील काही प्रमुख खेळाडूंना रिटेन केले आहे. तर आगामी आयपीएलमध्ये दोन नवीन संघाचा समावेश झाला आहे आणि ते संघ नवीन खेळाडूंना संघात घेण्याच्या तयारीला लागले आहेत. या दरम्यानच भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रिलीज केले आहे. अशातच जर अश्विन मेगा ऑक्शनमध्ये सामाविष्ट झाला तर त्याचे त्याच्या घरच्या संघाच पुनरागमन होऊ शकते. अश्विनने स्वत: महेद्रसिंग धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने सांगितले की, “चेन्नईचा संघ माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे, अशातच जर माझे घरच्या संघात पुनरागमन झाले तर मला खूप आनंद होईल.”

मी धोनीच्या संघात परतण्यास इच्छुक – अश्विन

अश्विनने म्हटले की, ” सीएसकेची ती फँचायझी आहे, जी माझ्या हृदयाच्या खूप जवळची आहे. माझ्यासाठी ती एका शाळेप्रमाणे आहे. येथे मी प्री केजी, एलकेजी, यूकेसी, प्रायमरी स्कूल आणि मिडिल स्कूल असा अभ्यास केला आहे. महाविद्यालयाची सुरूवात करताना १० वी देखील येथूनच उत्तीर्ण झालो आहे. त्यानंतर मी दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेतला, जिथे काही वर्ष ११ वी आणि १२ वी चा अभ्यास केला. नंतर काही वर्ष दुसऱ्या संस्थेमध्ये अभ्यास केला. ज्युनियर कॉलेज देखील दुसऱ्या जागी पूर्ण केले. मात्र, आता एवढा अभ्यास आणि सगळं काही केल्यानंर कोणाला नाही वाटणार की घरच्या संघात नाही परतले पाहिजे?. त्यामुळे मी आता देखील घरच्या संघात पुनरागमन करण्यासाठी इच्छुक आहे मात्र हे सगळं काही लिलावावर अवलंबून आहे.”

- Advertisement -

लक्षणीय बाब म्हणजे अश्विनने आयपीएलची सुरूवात देखील चेन्नईच्या संघासोबत केली होती. तो २००८ ते २०१५ पर्यंत धोनीच्या कर्णधारपदात खेळला होता. त्यानंतर त्याने पुणे सुपरजाइंट्ससोबत करार केला. त्यानंतर पंजाब किंग्स आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला आहे. मात्र आगामी आयपीएलसाठी दिल्लीच्या संघाने त्याला रिटेन केले नाही. अशातच जर नवीन दोन फँचायझी अहमदाबाद आणि लखनऊ यांसोबत त्याचा करार झाला नाही तर लिलावात चेन्नईचा संघ त्याच्यावर बोलू शकतो.


हे ही वाचा: http://AUS vs ENG 2nd Test : जो रूटचा नवा पराक्रम; एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावांमध्ये दिग्गजांना टाकले मागे

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -