घरताज्या घडामोडीIndian Raiway : ट्रेनमध्ये महिलांना सीट मिळण्याचे नो टेंशन ; मिळणार रिझर्व्ह...

Indian Raiway : ट्रेनमध्ये महिलांना सीट मिळण्याचे नो टेंशन ; मिळणार रिझर्व्ह बर्थ

Subscribe

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुखसोयीसाठी नेहमीच तप्तर असते. त्यातच आता महिलांसाठीही भारतीय रेल्वेने विशेष सुविधा सुरु केली आहे. ट्रेनमध्ये महिलांना सीट मिळणे हे खूप अडचणीचे झाले होते. ज्याप्रमाणे बस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांसाठी राखीव जागा असतात .त्याचप्रमाणे भारतीय रेल्वेसुद्धा महिलांसाठी सीट आरक्षित करण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेच्या वतीने लांबचा पल्ला गाठणाऱ्या ट्रेनमध्ये महिला प्रवाशांना बर्थ रिझर्व्ह करण्यात येणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले की,लांबच्या पल्ल्याच्या ट्रेनमध्ये महिलांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आणि आरामदायी होण्यासाठी भारतीय रेल्वेने रिझर्व्ह बर्थ सेवा पुरवण्याबरोबरच आणखी अनेक सुविधा देण्यात येत आहेत.

- Advertisement -

महिलांसाठी आरक्षित बर्थ

केंद्रीय मंत्री यांनी सांगितले की, मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये स्लीपर क्लासमध्ये सहा बर्थ आरक्षित करण्यात येणार आहे.गरीब रथ,राजधानी,दुरंतो यांसह वातानुकूलित एक्सप्रेस ट्रेनमध्ये थर्ड एसी कोचमध्ये सहा बर्थ हे महिला प्रवाशांसाठी आरक्षित करण्यात येत आहेत.

‘स्लीपर कोच’मध्ये सुद्धा आरक्षण

प्रत्येक स्लीपर कोचमध्ये सहा ते सात लोअर बर्थ, वातानुकूलित ३ टियरमध्ये कोचमधील चार ते पाच लोअर बर्थ आणि वातानुकूलित दोन टियर,तसेच, कोचमधील तीन ते चार लोअर बर्थ हे जेष्ठ नागरिकासांठी ठेवण्यात आले आहेत.याशिवाय ४५ वर्षाच्या आणि त्याहून अधिक वयाच्या महिला प्रवासी आणि गर्भवती महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे. रिझर्व्हेशन हे त्या ट्रेन श्रेणीच्या डब्ब्यांच्या सख्येंवर अवलंबून असणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – सहकार मोडीत काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -