घरताज्या घडामोडीAnil Parab Vs Ramdas kadam: पक्षच त्यावर बोलेल, अनिल परबांची रामदास कदमांच्या...

Anil Parab Vs Ramdas kadam: पक्षच त्यावर बोलेल, अनिल परबांची रामदास कदमांच्या आरोपांवर प्रतिक्रिया

Subscribe

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर घणाघाती हल्लाबोल केला आहे. अनिल परबांवर पक्षविरोधात कारवाई केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. कदमांनी केलेल्या आरोपांवर अनिल परब यांनी दोन ते चार शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना परब यांनी सावधगिरी बाळगली आहे. तसेच शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याविरोधातील माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिल्याचा आरोप आहे. अनिल परब शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. शिवसेना संपवण्याचे काम अनिल परब करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. यावर अनिल परब यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अनिल परब म्हणाले की, रामदास कदमांच्या आरोपांवर मला काही बोलायचे नाही. त्यांनी माझ्याविरोधात काहीही आरोप करु देत. ते शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या आरोपांवर पक्षच बोलेल त्यामुळे मी काही बोलू इच्छित नाही असे अनिल परब म्हणाले आहेत. परब यांनी बोलताना सावधानता बाळगली आहे.

- Advertisement -

उदय सामंतांचं नो कमेंट्स

अजिबात शिकवत नाही मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला हे जगजाहीर आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो हे देखील जगजाहीर आहे. जिल्हा बँकेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये ४६ पैकी ४१ मत घेऊन शिवसेनेचे उमेदवार निवडून आला आहे. त्याच्यामुळे मला बाकी काही बोलायचे नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात २०१४ पासून चांगले काम केले आहे. मी आता अंत होईपर्यंत शिवसेनेत राहणार आहे. त्यामुळे रामदास कदम यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे असे मला वाटत नाही. ते ज्येष्ठ आहेत असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

रामदास कदमांचा आरोप काय?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेना नेते आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असलेले अनिल परब यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. अनिल परब शिवसेनेच्या विरोधात कारवाया करत आहेत. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख असल्यासारखे परब वागत आहेत. अनिल परब माझ्याविरोधात काम करत आहेत. शिवसेनेले आणि मला धुळीस मिटवण्याचे काम अनिल परब करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. अनिल परब शिवसेनेतील गद्दार असल्याचेही कदम म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेना प्रमुख अनिल परब आहेत का उद्धव ठाकरे?, रामदास कदमांचा घणाघाती सवाल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -