घरक्रीडाIPL 2022 : RCB ने विराट कोहली व्यतिरिक्त या खेळाडूला केले रिटेन

IPL 2022 : RCB ने विराट कोहली व्यतिरिक्त या खेळाडूला केले रिटेन

Subscribe

जगातील सर्वात लोकप्रिय टी- २० लीग म्हणजेच इंडियन प्रीमीयर लीग आपल्या १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे

जगातील सर्वात लोकप्रिय टी- २० लीग म्हणजेच इंडियन प्रीमीयर लीग आपल्या १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे. ३० नोव्हेंबरला प्रत्येक संघाला रिटेन केलेल्या खेळांडूची यादी बीसीसीआयला सोपवण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० सोबतच आयपीएलमध्ये देखील कर्णधारपद सांभाळणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे आरसीबीच्या संघाचे कर्णधारपद कोण भूषवणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान आरसीबीच्या फँचायझीने विराट कोहली ग्लेन मॅक्सवेल सोबतच संघातील एका आक्रमक गोलंदाला कायम ठेवले आहे.

माहितीनुसार, आरसीबीच्या संघाने विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल व्यतिरिक्त गोलंदाज मोहम्मद सिराजला रिटेन केले आहे. सिराजने आरसीबीकडून खेळताना मागील काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. सिराज २०१८ पासून आयपीएलच्या स्पर्धेत खेळत आहे. आयपीएलच्या १४ व्या हंगामात त्याने १५ सामन्यांत ११ बळी घेतले आहेत. त्याच्याकडे आक्रमक गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. सिराजने आयपीएलच्या मागील काही वर्षात चमकदार कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले आहे. तर आरसीबीकडून चौथा खेळाडू कोण असणार याबाबत अद्याप संभ्रम आहे. कारण सलामीवीर देवदत्त पडिकल आणि युजवेंद्र चहल यांच्या नावाची चर्चा आहे, चहल आणि पडीकल दोघांनीही आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले होते.

- Advertisement -

विराट कोहलीने आयपीएल २०२१ मध्ये आरसीबीचे कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितले होते. कोहली त्याच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात आरसीबीसाठी एकही आयपीएलचा किताब जिंकू शकला नाही. दरम्यान आता आरसीबीसाठी एका नव्या कर्णधाराची गरज असणार आहे. कर्णधारपदासाठी कित्येक खेळांडूच्या नावाची चर्चा होत आहे.


हे ही वाचा: http://IPL 2022 Auction : कर्णधार मॉर्गनचा KKR मधून पत्ता कट; संघ आता नवीन लीडरच्या शोधात

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -