घरक्रीडाIPL 2022 : डेल स्टेनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, सनराईजर्स हैदराबाद संघात सामील झाल्यानंतर...

IPL 2022 : डेल स्टेनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, सनराईजर्स हैदराबाद संघात सामील झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Subscribe

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू आणि वेगवान गोलंदाज डेल स्टेन २६ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२२च्या हंगामात सामील झाला आहे. सनराइजर्स हैदराबाद संघाशी मुख्य गोलंदाज प्रशिक्षकम्हणून आपला नवीन प्रवास सुरु करण्यासाठी स्टेन भारतात दाखल झाला आहे. मागील वर्षा ऑगस्टमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर ३८ वर्षीय स्टेन सनराइजर्स हैदराबादच्या संघाच्या प्रशिक्षक टीमशी जोडले गेले आहेत. या टीममध्ये मुख्य प्रशिक्षक कोच टॉम मूडी आणि फलंदाज प्रशिक्षक ब्रायन लारा आणि स्पिन गोलंदाज प्रशिक्षक मुथैया मुलरीधरन यांचा समावेश आहे.

डेल स्टेनने हैदराबादच्या संघासाठी ९५ सामन्यात ९७ विकेट घेतले आहेत. हैदराबादच्या फ्रेंचायझीने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये डेल स्टेन म्हणाला आहे की, पुनरागमन झाल्यामुळे आनंदी आहे. दीर्घकाळ भारतात राहिलो आहे त्यामुळे खूप उत्स्फूर्त वाटत आहे. विमानतळावरुन निवासाच्या ठिकाणी जात असताना सर्व आठवणीसुद्धा ताज्या झाल्याचे डेल स्टेन याने सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान डेल स्टेन पुढे म्हणाला की, मी इथे यापूर्वीसुद्धा दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत, आयपीएलच्या संघासोबत भारतात आलो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मला खूप छान वाटत आहे. माझ्यासाठी नवी भूमिका आहे ती म्हणजे कोचिंगची भूमिकेसाठी तयार आहे. मी मैदानात उतरण्यासाठी तयार असून खेळाडूंसाठीदेखील नवीनच भूमिका असणार आहे.

वेगवान खेळाडू डेल स्टेनने २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय करियर संपवल्यानंतर स्टेन याने टी-२० विश्व कपमध्ये समालोचने केले होते. डेल स्टेन स्वतः आयपीएलमध्ये खेळला आहे. एकूण ११ हंगामात स्टेनचा सहभागच राहिला आहे. २००८ पासून २०१६ पर्यंत यानंतर २०१९ -२० पर्यंत स्टेन आयपीएल खेळला आहे. आयपीएलमध्ये २०१३ रोजी १७ सामन्यात १९ विकेट घेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याचे उत्तम प्रदर्शन ११ धावा देत ३ विकेट घेण्याचा राहिले आहे. शेवटच्या सामन्यात २०२० मध्ये तीन सामने खेळला असून फक्त १ गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2022 मधून मार्क वुड बाहेर, लखनौ सुपरजायंट्सला मोठा धक्का

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -