घरक्रीडाIPL 2022 मधून मार्क वुड बाहेर, लखनौ सुपरजायंट्सला मोठा धक्का

IPL 2022 मधून मार्क वुड बाहेर, लखनौ सुपरजायंट्सला मोठा धक्का

Subscribe

दुखापतीमुळे IPL 2022 मधून बाहेर पडणारा तो इंग्लंडचा तिसरा खेळाडू आहे. त्याच्याआधी कोलकाताचा अॅलेक्स हेल्स आणि गुजरात टायटन्सचा जेसन रॉय हेही दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. मार्क वुड इंग्लंडकडून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळत असताना त्याला दुखापत झाली होती. मात्र, लखनौ संघाने अद्याप त्याच्या जागी एकाही खेळाडूचा समावेश केलेला नाही.

IPL 2022: आयपीएल सुरू होण्यापूर्वी लखनऊ संघाला मोठा धक्का बसलाय. संघाचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर गेलाय. आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी लखनौच्या संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड अल्नर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलाय.

दुखापतीमुळे IPL 2022 मधून बाहेर पडणारा तो इंग्लंडचा तिसरा खेळाडू आहे. त्याच्याआधी कोलकाताचा अॅलेक्स हेल्स आणि गुजरात टायटन्सचा जेसन रॉय हेही दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. मार्क वुड इंग्लंडकडून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळत असताना त्याला दुखापत झाली होती. मात्र, लखनौ संघाने अद्याप त्याच्या जागी एकाही खेळाडूचा समावेश केलेला नाही.

- Advertisement -

मेगा लिलावात लखनौच्या टीमने 7.5 कोटी रुपयांना वुडला विकत घेतला होता. त्याच्या दुखापतीमुळे लखनौचा संघ मोठ्या संकटात अडकला आहे. मार्क वुड व्यतिरिक्त लखनौमध्ये जेसन होल्डर, मार्कस स्टॉयनिस आणि दुष्मंता चमिरा हे परदेशी खेळाडू आहेत. यापैकी होल्डर आणि स्टॉयनिस हे पहिल्या काही सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाहीत. कारण इंग्लंड संघ वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान मालिका खेळत आहे. त्याचबरोबर चमिरा भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही खेळला नाही, पण आता तो तंदुरुस्त आणि खेळण्यासाठी तयार आहे. याशिवाय लखनौच्या संघात क्विंटन डी कॉक, एविन लुईस आणि काइल मायर्स या खेळाडूंचाही समावेश आहे. मायर्स हा वेस्ट इंडिज संघाचा भाग असून, तोही सलामीचा सामना खेळू शकणार नाही.

लखनौजवळ सर्वात कमी खेळाडू

IPL 2022 मध्ये लखनौच्या संघात सर्वात कमी खेळाडू आहेत. मेगा लिलावात लखनौने केवळ 21 खेळाडूंना खरेदी केले होते. अशा स्थितीत लखनौ संघाकडे एक खेळाडू दुखापत झाल्यास आणि काही खेळाडू अनुपलब्ध असल्यास फारसा पर्याय नाही. स्पर्धेदरम्यान खेळाडूंना दुखापत झाल्यास हा संघ अडचणीत येऊ शकतो.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -